Triumph Trident 660 ची भारतात डिलीव्हरी सुरु, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

ब्रिटीश मोटारसायकल निर्माती कंपनी Triumph ने यावर्षी एप्रिल महिन्यात त्यांची ट्रायडंट 660 बाईक (Triumph Trident 660) लाँच केली होती.

Triumph Trident 660 ची भारतात डिलीव्हरी सुरु, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Triumph Trident 660
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 10:06 PM

मुंबई : ब्रिटीश मोटारसायकल निर्माती कंपनी Triumph ने यावर्षी एप्रिल महिन्यात त्यांची ट्रायडंट 660 बाईक (Triumph Trident 660) लाँच केली होती. या बाईकची एक्स शोरुम किंमत 6.95 लाख रुपये इतकी आहे. ट्रायम्फ मोटरसाइकलने आता भारतात त्यांच्या ट्रायडंट 660 बाईकची डिलीव्हरी सुरु केली आहे. ट्रायडंट 660 लाईनअपमध्ये हे सर्वात किफायतशीर मॉडेल आहे. ही बाईक कंपनीच्या नव्या प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आली आहे. (Triumph Trident 660 deliveries started in India, check price and features)

या बाईकच्या इंजिनविषयी बोलायचे झाले तर 2021 ट्रायम्फ ट्रायडंट 660 (2021 Triumph Trident 660) ला एक नवीन 660cc ट्रिपल सिलेंडर इंजिन मिळेल जे 10,250 आरपीएम वर जास्तीत जास्त 80bhp पॉवर आणि 6,250 आरपीएम वर 64nm पीक टॉर्क जनरेट करेल. या इंजिनसह स्लिप आणि असिस्ट क्लचसह 6 स्पीड गिअरबॉक्स देखील उपलब्ध असेल.

दमदार फीचर्स

2021 Triumph Trident 660 मध्ये तुम्हाला नवीन-रेट्रो स्टाईल राऊंड एलईडी हेडलॅम्प्स, बीफी फोर्क्स, सेल्फ-कॅन्सिलिंग एलईडी इंडिकेटर अशी वैशिष्ट्ये मिळतील. याशिवाय यामध्ये एलईडी लायटिंग, राऊंड कन्सोलवर पूर्णपणे डिजिटल युनिट मिळेल, ज्यामध्ये स्पीड, रीव्ह्ज, फ्यूल स्टेट आणि सिलेक्टेड गियरची माहिती मिळेल. तसेच या बाईकच्या खालच्या बाजूला हाफ कलर टीएफटी पॅनेल असेल, ज्याद्वारे आपण आपला स्मार्टफोन कनेक्ट करू शकता. यासाठी, आपल्याला एक स्वतंत्र मॉड्यूल खरेदी करावे लागेल.

Trident 660 मध्ये तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, राईड-बाय-वायर आणि स्विच क्यूब गोप्रो कंट्रोल्ससारख्या तांत्रिक वैशिष्ट्यांसह बरेच फीचर्स मिळतील. रोड आणि रेन या दोन रायडिंग मोडसह ही बाईक सादर करण्यात आली आहे. ही बाईक स्विचेबल ट्रॅक्शन कंट्रोल, ABS स्टँडर्ड स्लिप आणि असिस्ट क्लचसह येते.

इतर बातम्या

पावसाळ्यात आपल्या बाईकची अशी घ्या काळजी, या 5 महत्वाच्या गोष्टींची करा तयारी

अवघ्या 1200 रुपयात घरी न्या Bajaj ची शानदार बाईक, एक लीटर पेट्रोलमध्ये 90 किमी मायलेज

PHOTO | एका लिटर पेट्रोलमध्ये 104 किमी धावतील या बाईक, किंमत 50 हजारांपेक्षा कमी

(Triumph Trident 660 deliveries started in India, check price and features)

Non Stop LIVE Update
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.