दिवाळीपूर्वी कार घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, या कारवर मिळतेय 1.05 लाखांची सूट, खरेदीसाठी प्रचंड गर्दी
जर तुम्ही देखील दिवाळीच्या आधी कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. लाखो ग्राहकांची आवडती कार असणाऱ्या या कारवर मिळतेय तब्बल 1.05 लाख रुपयांपर्यंतची सूट. खरेदीसाठी होतेय शोरुममध्ये गर्दी.

दिवाळीपूर्वी कार खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. Hyundai Motor India ने नोव्हेंबर 2026 मध्ये आपल्या लोकप्रिय हॅचबॅक आणि सेडान कारवर आकर्षक डिस्काउंट जाहीर केले आहेत. AUTO PUNDITZ च्या रिपोर्टनुसार, Grand i10 Nios, Aura, i20 आणि Verna या कारवर ग्राहकांना तब्बल 1.05 लाख रुपयांपर्यंतचे फायदे मिळू शकतात.
Hyundai Grand i10 Nios
Grand i10 Nios वर नोव्हेंबरमध्ये 75 हजार रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत. यामध्ये Era पेट्रोल व्हेरिएंटवर 25 हजार रुपये तर इतर पेट्रोल व्हेरिएंटवर 75 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. CNG व्हेरिएंटवरही 70 हजार रुपयांपर्यंतचे फायदे दिले जात आहेत.
Hyundai Aura
Hyundai Aura खरेदी करणाऱ्यांना 40 हजार रुपयांपर्यंतचे डिस्काउंट मिळू शकतात. पेट्रोल व्हेरिएंटवर 25 हजार रुपये तर S CNG, SX CNG आणि Corporate CNG व्हेरिएंटवर 40 हजार रुपयांपर्यंतचे फायदे उपलब्ध आहेत.
Hyundai i20 आणि i20 N Line
Hyundai i20 आणि i20 N Line वर ग्राहकांना 65 हजार रुपयांपर्यंतचे फायदे मिळत आहेत. i20 च्या सुरुवातीच्या Era MT व्हेरिएंटवर 25 हजार रुपयांची सूट आहे. तर इतर काही व्हेरिएंट आणि i20 N Line च्या निवडक व्हेरिएंटवर 65 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो.
Hyundai Verna
या ऑफरमध्ये Hyundai Verna वर सर्वाधिक सूट दिली जात आहे. जुन्या iVT व्हेरिएंटवर तब्बल 1.05 लाख रुपयांपर्यंतचे फायदे मिळू शकतात. जुन्या नॉन-iVT व्हेरिएंटवर 80 हजार रुपये तर नवीन Verna च्या HX8 आणि DCT व्हेरिएंटवर 85 हजार रुपयांपर्यंत सूट आहे. इतर नवीन व्हेरिएंटवर 75 हजार रुपयांपर्यंतचे फायदे मिळू शकतात.
डिस्काउंटमध्ये कोणत्या ऑफर्सचा समावेश?
या ऑफर्समध्ये कॅश डिस्काउंट, दिवाळी बोनस, एक्सचेंज बोनस, स्क्रॅपेज इन्सेंटिव्ह आणि अपग्रेड बोनस यांचा समावेश असू शकतो. तसेच पात्र ग्राहकांना कॉर्पोरेट, सरकारी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी असलेले अतिरिक्त फायदेही मिळू शकतात.
महत्त्वाची सूचना : हे डिस्काउंट नोव्हेंबर 2026 साठी जाहीर करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष सवलतीची रक्कम शहर, डीलरशिप, कारचे व्हेरिएंट आणि उपलब्ध स्टॉकनुसार बदलू शकते. त्यामुळे कार खरेदी करण्यापूर्वी जवळच्या Hyundai डीलरशी संपर्क साधून अंतिम ऑन-रोड किंमत आणि लागू ऑफर्सची माहिती घ्या.
