AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईल मधील Refresh Rate चं नेमकी काम काय? आणि तो किती महत्वाचा आहे, जाणून घ्या

रिफ्रेश रेट म्हणजे काय? जेव्हा एखादा फोन लाँच होतो, तेव्हा कंपनी अनेकदा रिफ्रेश रेटचा उल्लेख करते, पण ते नक्की काय असते? आणि त्याचा तुम्हाला काय फायदा होतो, हे आपण आजच्या लेखात सविस्तरपणे जाणून घेऊयात.

मोबाईल मधील Refresh Rate चं नेमकी काम काय? आणि तो किती महत्वाचा आहे, जाणून घ्या
mobile
| Edited By: | Updated on: Jun 25, 2026 | 1:13 PM
Share

आजकाल स्मार्टफोन खरेदी करताना बहुतेक लोकं कॅमेरा, बॅटरी, प्रोसेसर आणि रॅम यांचा विचार करतात. अशातच फोन खरेदी करताना तुम्ही डिस्प्ले टॅक्नॉलॉजी विचार करून खरेदी केलात तर फोन वापरण्याचा अनुभव उत्तम मिळेल. कारण डिस्प्ले टॅक्नॉलॉजी म्हणजे फोनचा रिफ्रेश रेट. जेव्हा बाजारपेठेत नवीन स्मार्टफोन लाँच होतो, तेव्हा तुम्ही कंपनीकडून त्याचा रिफ्रेश रेट, जो 60 Hz, 90 Hz, 120 Hz किंवा 144 Hz असतो, याचा उल्लेख ऐकला असेल. पण हा रिफ्रेश रेट नेमका काय असतो? लाँच इव्हेंटमध्ये प्रत्येक मोबाईल कंपनी त्यांच्या हँडसेटच्या रिफ्रेश रेटची माहिती देणे इतके महत्त्वाचे का समजते. असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? बाजारात वेगवेगळ्या रिफ्रेश रेटचे फोन उपलब्ध आहेत, त्यामुळे तुमचा पुढचा स्मार्टफोन निवडण्यापूर्वी तुमच्याकडे रिफ्रेश रेटबद्दल अचूक माहिती असायला हवी. रिफ्रेश रेट फक्त मोबाईल फोनपुरते मर्यादित नाहीत. तुम्ही स्मार्ट टीव्ही खरेदी करत असाल तरीही, त्याचा रिफ्रेश रेट विचारात घेणे महत्त्वाचे आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या रिफ्रेश रेटबद्दल अधिक जाणून घेऊयात.

रिफ्रेश रेट म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, रिफ्रेश रेट म्हणजे फोनची स्क्रीन एका सेकंदात किती वेळा रिफ्रेश किंवा अपडेट होते. तुम्हाला रिफ्रेश रेटच्या पुढे “Hz” लिहिलेले दिसेल, कारण रिफ्रेश रेट Hz मध्ये मोजला जातो. जसे की, तुमच्या फोनच्या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 60Hz असेल, तर याचा अर्थ असा की प्रति सेकंद 60 वेळा स्क्रीन अपडेट करते. त्याचप्रमाणे, 90Hz स्क्रीन प्रति सेकंद 90 वेळा स्वतःला रिफ्रेश करते आणि 120Hz स्क्रीन 120 वेळा रिफ्रेश करते. थोडक्यात, स्मार्टफोनची स्क्रीन सतत अनेक फ्रेम्स वेगाने बदलत असते, ज्यामुळे प्रत्येक हालचाल स्पष्ट होते. स्क्रीन जितक्या जास्त वेळा रिफ्रेश होईल, तितका पाहण्याचा अनुभव अधिक चांगला आणि स्मूद होतो.

उच्च रिफ्रेश रेट चांगला मानला जातो

उच्च रिफ्रेश रेट असलेल्या स्क्रीनवर स्क्रोलिंग, ॲप्समध्ये स्विच करणे, सोशल मीडिया ब्राउझ करणे आणि ॲनिमेशन्स अधिक सुरळीत दिसते. यामुळेच अनेक वापरकर्त्यांना 120Hz डिस्प्ले वापरल्यानंतर 60Hz स्क्रीन स्लो वाटतो. वाढलेल्या रिफ्रेश रेटमुळे स्क्रीनवरील प्रत्येक क्रिया अधिक नॅच्युरल आणि फ्लूइड दिसते, म्हणूनच स्मार्टफोन कंपन्या याला एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणून सांगतात.

यामुळे तुम्हाला काय फायदा मिळतो आणि ते महत्त्वाचे का आहे?

फोन असो वा टीव्ही स्क्रीन, अनेक फ्रेम्स सतत वेगाने बदलत असतात, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक हालचाल पाहता येते. त्यामुळे स्क्रीन जितक्या जास्त वेळा रिफ्रेश होते, तितका अनुभव अधिक सुरळीत मिळतो. तुम्हालाही फोन वापरताना अधिक सुरळीत अनुभव हवा असेल, तर तुम्ही जास्त रिफ्रेश रेट असलेला फोन निवडू शकता. मात्र जास्त रिफ्रेश रेट असलेला फोन निवडण्यापूर्वी तुम्हाला याच्या दुसऱ्या बाजूचीही जाणीव असायला हवी. ती म्हणजे जास्त रिफ्रेश रेटमुळे बॅटरीचा वापर वाढू शकतो.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?