AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टाटाची कार फुकट मिळवा, WhatsApp वर मेसेज व्हायरल, डेटा चोरीसाठी चीनी हॅकर्सची शक्कल

व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक प्रकारचे मेसेजेस असतात जे कधीकधी खरे तर कधी खोट्या अफवा असतात. अशा परिस्थितीत युजर्सना या मेसेजेसमागचे सत्य माहित नसते.

टाटाची कार फुकट मिळवा, WhatsApp वर मेसेज व्हायरल, डेटा चोरीसाठी चीनी हॅकर्सची शक्कल
Tata Safari
| Edited By: | Updated on: Jun 12, 2021 | 10:06 PM
Share

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक प्रकारचे मेसेजेस असतात जे कधीकधी खरे तर कधी खोट्या अफवा असतात. अशा परिस्थितीत युजर्सना या मेसेजेसमागचे सत्य माहित नसते. अनेकदा त्या मेसेजमध्ये असलेल्या लिंकवर क्लिक करताच ते फसवणूकीचा बळी ठरतात. अलीकडेच, आपल्याला टाटा मोटर्सकडून विनामूल्य भेटवस्तूचा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर आला असेल. परंतु आपल्याला या मेसेजचे सत्य माहीत आहे का? वास्तविक हा एक फेक मेसेज आहे जो चीनी हॅकर्सनी भारतीय युजर्सना फसवण्यासाठी, त्यांचा डेटा हॅक करण्यासाठी पाठवला आहे. (What is Tata Safari Whatsapp scam which is running by chinese users)

सायबरपीस फाउंडेशनच्या सायबर सुरक्षा रिसर्चर्सनी या संशोधनाचा खुलासा केला आहे. हा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवरुन प्रसारित केला जात आहे. या मेसेजमध्ये असे लिहिले आहे की, आपल्याकडे टाटा सफारी विनामूल्य खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. परंतु, हा मेसेज पाठवून, हॅकर्स आपली वैयक्तिक माहिती चोरण्याच्या प्रयत्नात आहेत.

वेबसाइटच्या माध्यमातून लोकांची फसवणूक

या कँपेनवर असे स्पष्टपणे लिहिले आहे की, ही टाटा मोटर्सची ऑफर आहे, परंतु त्यावर क्लिक केल्यावर युजर थेट थर्ड पार्टी डोमेनवर जातो आणि तिथे टाटा मोटर्सचे कोणतेही अधिकृत पेज ओपन होत नाही. यानंतर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गिफ्ट सेक्शन दाखवलं जातं. तसेच ही थर्ड पार्टी ऑफर किती चांगली आणि खरी आहे, हे सांगण्यासाठी काही बनावट फेसबुक कमेंट्स दिसतात.

Tata Safari Whatsapp scam

वेबसाईट खरी आहे, असे भासवण्यासाठी खाली बर्‍याच फेसबुक कमेंट्स अॅड करण्यात आल्या आहेत. तसेच निळ्या रंगात टाटा सफारीचा फोटोदेखील या पेजवर अॅड करण्यात आला आहे. या साईटवर गिफ्ट जिंकण्यासाठी ग्राहकांना तीन संधी दिल्या जात आहेत आणि शेवटी युजर्सनी टाटा सफारी जिंकली आहे, असं दाखवलं जातं. त्यानंतर युजरला एक मेसेज दिसतो, ज्यावर लिहिलं आहे की, तुम्हाला हे गिफ्ट हवे असेल तर तुम्हाला हा मेसेज/लिंक व्हाट्सअॅपवर तुमच्या मित्रांसोबत आणि विविध व्हाट्सअॅप ग्रुपवर शेअर करावी लागेल.

चीनी कनेक्शन उघड

संशोधनानंतर थर्ड डोमेनबद्दल असे आढळले आहे की, ते चिनी डोमेन आहे जे भारतीयांना लक्ष्य करीत आहे. हॅकर्सनी फक्त येथे सफारीचा वापर केला आहे, कारण त्यांना माहित आहे की ही कार वाहन भारतात किती लोकप्रिय आहे.

अशा प्रकारचा कोणताही मेसेज/लिंक तुम्हाला व्हॉट्सअॅपवर आल्यास त्यावर क्लिक करु नका

इतर बातम्या

दमदार प्रोसेसर आणि डिस्प्लेसह Realme X7 Max 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

लाँचिंगपूर्वीच Samsung Galaxy Tab S8 ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या काय असेल खास?

(What is Tata Safari Whatsapp scam which is running by chinese users)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.