केव्हा लाँच होणार Tata Sierra EV ? किती किंमत असणार पहा ?

टाटा मोटर्स हे कार कंपनीत प्रतिष्ठीत नाव म्हटले जाते. टाटा सिएरा ही बाजारातील पहिली एसयुव्ही म्हटले जाते. आता तिचा इलेक्ट्रीक अवतार दाखल होणार आहे.

केव्हा लाँच होणार Tata Sierra EV ? किती किंमत असणार पहा ?
Tata Sierra EV Expected Price
| Updated on: Dec 05, 2025 | 7:30 PM

Tata Sierra EV Expected Price: टाटा सिएरा पेट्रोल आणि डिझेल पॉवरट्रेन सह भारतीय बाजारात आली होती. टाटाच्या या एसयुव्हीचा ICE व्हेरिएंट्ससह इलेक्ट्रीक मॉडेल लाँच झाले नव्हते. आता पुढच्या वर्षी टाटा सिएरा ईव्ही प्रथमच लाँच होणार आहे.किती आहे तिची किंमत आणि काय आहे वैशिष्ट्ये पाहूयात…

टाटा मोटर्सने जेव्हा गेल्या वर्षी साल २०२४ मध्ये टाटा कर्व्ह ( Tata Curvv ) लाँच केली होती. तेव्हा पेट्रोल आणि डिझेल मॉडेलच्या आधी इलेक्ट्रीक कारना बाजारात उतरवले होते. परंतू यावेळी टाटाने ICE व्हेरिएंट्स आधी लाँच केली आहे. तर टाटा सिएरा ईव्ही पुढच्या वर्षी २०२६ च्या पहिल्या महिना जानेवारीत बाजारात लाँच करणार आहे.

केव्हा लाँच होणार Sierra EV?

टाटा सिएरा इलेक्ट्रीक कार पुढच्या वर्षी २०२६ मध्ये २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन्याच्या मुहूर्तावर लाँच केली जाऊ शकते. सिएरा सुमारे तीन दशकाआधी १९९१ मध्ये भारतात लाँच झाली होती. हे देशात तयार झालेली पहिली सुव्ह कार होती.आता ही कार रेट्रो इंस्पायर्ड डिझाईन आणि एडव्हान्स ईव्ही आर्किटेक्चरसह भारतीय बाजारात प्रवेश करणार आहे. टाटा सिएरा ईव्ही लाँचिंगसह ऑटोमेकर्स आपल्या ईव्ही पोर्टफोलियोला आणखीन मजबूत बनवू इच्छित आहे.

काय असणार Tata Sierra EV ची किंमत?

टाटा सिएरा ईव्ही कारची किंमत २० लाख रुपयांपासून सुरु होऊन ३० लाखाच्या रेंजमध्ये बाजारात लाँच केली जाऊ शकते. टाटाची ही इलेक्ट्रीक कार acti.ev  प्लॅटफॉर्मवर बेस्ड होऊ शकते. ही कार रिअर व्हील ड्राईव्ह आणि ऑल व्हील ड्राईव्ह अशो दोन्ही कॉन्फिगरेशनमध्ये येऊ शकते. सिएरा ईव्हीत बॅटरी पॅक दोन पर्याय असू शकतात. ज्यात ही कार पूर्ण चार्ज केल्यानंतर ४५० ते ५५० किमीची रेंज धावू शकते.

टाटाच्या कारमध्ये ड्युअल डिस्प्ले इंफोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस स्मार्टफोन इंटीग्रेशन आणि एक ३६० डिग्री HD कॅमेरा मिळू शकतो. सिएरा ईव्हीमध्ये सेफ्टीसाठी आता ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, ट्रॅक्शन कंट्रोल आणि हिल होल्ड असिस्टचे फिचर मिळू शकते. या ईव्हीमध्ये लेव्हल 2 ADAS चे फिचर देखील मिळणार आहे.