AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CNG वा EV कोणती कार करते जास्त प्रदूषण? माहीती ऐकून आश्चर्यचकीत व्हाल

CNG or EV Car increase Pollution : जर तुम्ही इलेक्ट्रीक कार खरेदी करण्याचा विचार करीत असाल आणि ती कार पर्यावरण अनुकूल आहे त्यामुळे निर्धास्त होत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सीएनजी किंवा इलेक्ट्रीक वाहनांच्या तुलनेत कोणती कार प्रदुषण पसरवते ते पाहा

CNG वा EV कोणती कार करते जास्त प्रदूषण? माहीती ऐकून आश्चर्यचकीत व्हाल
| Updated on: Jun 28, 2025 | 6:16 PM
Share

हल्ली वाढत्या प्रदुषणामुळे सर्वजण पर्यावरणीय स्नेही उपकरणे वापरत आहेत. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे तर प्रदुषणात मोठी वाढ होत आहे. सर्वाधिक प्रदुषण डिझेलवरील वाहने करतात त्यामुळे अशा वाहनांची संख्या कमी केली जात आहे. तसेच सीएनजी आणि इलेक्ट्रीक वाहनांची संख्या वाढविण्याकडे सरकारचा कल आहे. दिल्लीत येथे तर वाहनांची संख्या कमी करण्यासाठी ऑड-ईव्हन नियम लागू केलेला आहे. या नियमातून सीएनजी आणि इलेक्ट्रीक वाहनांना वगळण्यात आले आहे. परंतू ही वाहने प्रदुषण करीत नाहीत का ? असा सवाल तुमच्या मनात निश्चित निर्माण झाला असेल तर पाहूयात काय नेमके उत्तर आहे.

रस्त्यावर कोट्यवधी कार आणि इतर अवजड वाहनांची वाहतूक सुरु असते. यात बहुतांशी कार पेट्रोलवर तर अवजड वाहने डिझेलवर धावणारी असतात. या गाड्यांनी प्रदुषणात वाढ होत असते. सीएनजी आणि इलेक्ट्रीक कारचा पर्याय आता आलेला आहे. परंतू या कारद्वारे प्रदुषण होत नाही असा आपला समज असेल तर तो आधी दूर करा.इलेक्ट्रीक कार आणि सीएनजी कार विकत घेणार असाल तर कोणती कार अधिक प्रदुषण करते ते पाहूयात…

इलेक्ट्रीक व्हेईकल प्रदूषण करतात ?

इलेक्ट्रीक व्हेईकल सामान्यपणे पर्यावरण अनुकूल म्हटले जाते. इलेक्ट्रीक वाहने धावताना धुर सोडत नाहीत. त्यामुळे अनेकांना वाटते की त्या शून्य टक्के प्रदुषण करीत असतील. परंतू हे संपूर्ण सत्य नाही. इलेक्ट्रीक वाहनात असणारी बॅटरी बनवताना त्यात लिथीयम कोबाल्ट आणि निकेल सारख्या खनिजांचा वापर केला जातो. या मिनरल्सच्या खाणींमुळे वातावरण आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असतो. तसेच या इलेक्ट्रीक वाहनांना चार्ज करण्यासाठी ज्या वीजेचा वापर केला जातो. त्या वीजेची निर्मितीसाठी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात कोळसा जाळला जातो. असे प्रकल्प असलेल्या शहरातील दैनंदिन जीवन धुर आणि धुळीच्या प्रदुषणाने नर्क झालेले आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक वाहन वापरणे म्हणजे प्रदुषण शुन्य टक्के होते असे मानणे कितपत बरोबर आहे ?

सीएनजी वाहन किती प्रदूषण करतात ?

सीएनजी वाहनांचा विचार करता ही वाहने पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत कमी प्रदुषण करतात. यात कार्बन मोनोऑक्साईड आणि पार्टीकुलेट मॅटर असतात. परंतू ते कमी प्रमाणात असतात. तरीही सीएनजी वाहन देखील संपूर्णपणे ग्रीन एनर्जी नाही. कारण याच्यावापरातूनही CO2 गॅस बाहेर पडत असतो.

कोण करते जास्त प्रदूषण ?

दोन्ही वाहनांची तुलना केली असता सीएनजी कार सध्या इलेक्ट्रीक वाहनांच्या तुलनेत कमी प्रदुषण करीत आहेत. हे आश्चर्यचकीत करणारे तथ्य आहे. कारण सर्वांना वाटत असते की इलेक्टीक वाहनांना सिलेंडर पाईप नसतो ना त्यातून धुर येत नाही. त्यामुळे इलेक्ट्रीक वाहन घेतले की आपण निर्धास्त असे नसते. प्रदुषण पसरवण्यात यांच्यात केवळ 19-20 चा फरक आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.