
मुंबई : कारला पुढील बाजूस बंपर आणि लोखंडी जाळी ज्याला आपण ग्रिल म्हणतो (Car Front Grill) ते दोन्ही असतात परंतु मागील बाजूस ग्रिल दिलेली नसते. कारच्या मागील बाजूस फक्त बंपर दिलेले असते आणि डिझाइन सुधारण्यासाठी स्किड प्लेट्स दिल्या असतात. मग तुम्ही कधी विचार केला आहे का की कारला फ्रंट ग्रिलच का दिले जातात आणि फक्त बंपर का दिले जात नाहीत? यामागे अनेक कारणे आहेत, त्यापैकी दोन मोठी कारणे आहेत. फार कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. चला जाणून घेऊया.
1. कारमध्ये ग्रिल हा महत्त्वाचा भाग आहे कारण ते कारचे इंजिन थंड ठेवण्यास मदत करते. ग्रिलमध्ये लहान छिद्रं असतात, ज्याद्वारे बाहेरील हवा इंजिनपर्यंत पोहोचते. ही हवा इंजिनला जास्त गरम होण्यापासून रोखते आणि थंड ठेवण्यास मदत करते. तथापि, इंजिन थंड ठेवण्यासाठी कारमध्ये इतर उपाय देखील केले जातात, परंतु हे देखील त्यापैकी एक आहे. इंजिन योग्य तापमानात राहिल्यास ते चांगले कार्य करते.
2. ग्रिलमुळे कारचे फ्रंट डिझाईन चांगले बनवण्यास मदत होते. कारच्या पुढील भागाला नवीन आणि फ्रेश लुक देण्यासाठी ग्रिलचा वापर केला जातो. हे कार कंपन्यांना त्यांच्या कार इतरांच्या कारपेक्षा वेगळे करण्यात मदत करते. तुमच्या लक्षात आले असेल की साधारणपणे प्रत्येक कार कंपनीच्या गाड्यांमध्ये मिळणाऱ्या ग्रिलचे डिझाइन वेगळे असतात. कार कंपन्याही वेळोवेळी ग्रिल बदलत असतात.
गाड्यांमध्ये ग्रिल देण्याऐवजी बंपर वरपर्यंत वाढवले तर त्याचे अनेक नुकसान होऊ शकतात. सर्वात मोठा तोटा म्हणजे याचा परिणाम इंजिनच्या कूलिंगवर होईल. बंपर बंद असते आणि हवा इंजिनपर्यंत पोहोचण्यासाठी त्यातून जाणार नाही, ज्यामुळे इंजिनच्या थंड होण्यावर परिणाम होईल कारण हवेची योग्य मात्रा इंजिनपर्यंत पोहोचणार नाही. इंजिन थंड ठेवण्याचा हा नैसर्गिक उपाय आहे.