AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीला निघालेल्या विमान अपघाताबद्दल धक्कादायक माहिती, 7 जणांचा मृत्यू, ज्याठिकाणी अपघात झाला तिथे…

दिल्लीला जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला असून या अपघाताबद्दल मोठी माहिती पुढे येत आहे. विमानाचा संपर्क तुटल्यानंतर काही वेळातच सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. घटनास्थळी अधिकारी पोहोचले. पण विमानाची सर्वांचा मृत्यू झाला.

दिल्लीला निघालेल्या विमान अपघाताबद्दल धक्कादायक माहिती, 7 जणांचा मृत्यू, ज्याठिकाणी अपघात झाला तिथे...
Delhi plane crash
| Updated on: Feb 24, 2026 | 7:25 AM
Share

झारखंडची राजधानी रांची येथील बिरसा मुंडा विमानतळावरून निघालेल्या विमानाची भीषण अपघात झाला. हे विमान झारखंड येथून दिल्लीकडे निघाले होते. हे एक खाजगी चार्टर्ड रुग्णवाहिका विमान होते. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच या विमानाचा संपर्क तुटला. विमानात एकून 7 जण प्रवास करत होते. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व सात प्रवाशांचा मृत्यू झाला, हा अत्यंत भीषण अपघात होता, यापैकी एकही प्रवासी वाचू शकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला. विमान अपघातानंतर काही वेळातच तपास ब्युरो (AAIB) ची एक टीम घटनास्थळी दाखल झाली. या विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालक यांच्याकडून एक निवेदनीही जारी करण्यात आले. मात्र, या विमान अपघातामुळे मोठी खळबळ उडाली.

मिळालेल्या डीजीसीएच्या माहितीनुसार, विमानाने रांची विमानतळावरून सायंकाळी 7 वाजून 11 मिनिटाला उड्डाण केले. कोलकता हवाई वाहतूक नियंत्रणाशी त्यांचा शेवटचा संपर्क 7 वाजून 34 मिनिटाला झाला. त्यानंतर विमान रडार आणि रेडिओच्या संपर्कातून बाहेर गेले. वाराणसीच्या आसपास हा संपर्क तुटला. या विमानाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण कोणताही संपर्क होऊ शकत नव्हता.

वाराणसी एअर ट्रॅफिक कंट्रोल नुसार, त्यांच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर विमानाशी संपर्क झाला नाही. शेवटी विमानाची संपर्क होत नसल्याचे लक्षात येताच बचाव समन्वय केंद्र सक्रिय करण्यात आले आणि लगेचच शोध मोहिम सुरू करण्यात आली. झारखंडमधील चतरा आणि सिमरियाच्या सीमावर्ती भागात विमान कोसळल्याचे स्पष्ट झाले. ज्या भागात हे विमान कोसळले, त्या भागात अचानक वातावरण खराब आणि पाऊस झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानाची 7 ही जणांचा मृत्यू झाला. कॅप्टन विवेक विकास बिलगत, कॅप्टन सवरदीप सिंग, रुग्ण संजय कुमार, अर्चना देवी, धुरु कुमार हे होते तर यासोबच डॉ. विकास कुमार गुप्ता डॉक्टर, सचिन कुमार मिश्रा हे देखील विमानात होते. अपघात नेमका कसा झाला याचा शोध सध्या घेतला जात आहे. या विमान अपघाताचे प्राथमिक कारण तर खराब हवामान सांगितले जात आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा