भारतात डिझेलवर चालणाऱ्या गाड्या 4 वर्षानंतर बंद होणार ?
केंद्र सरकारकडे एक प्रस्ताव आला असून त्याने डीझेलवर धावणाऱ्या गाड्यांना धोका निर्माण झाला आहे. पेट्रोलीयम मंत्रालयाच्या एका कमिटीने यासंदर्भात एक शिफारस केली आहे. ती जर मान्य झाली तर डीझेल कार कचराच होतील.

मुंबई : तुमच्याकडे जर डीझेल कार आहे किंवा तुम्ही डीझेलवर कार घेण्याच्या फंद्यात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण येत्या काही वर्षांत डीझेलवर ( diesel car) चालणाऱ्या गाड्यांचा भाव अक्षरश: कचरा ठरविणारी बातमी आली आहे. केंद्र सरकारने ( centre government ) डीझेल होणारे हवेचे प्रदुषण ( air pollution ) रोखण्यासाठी डीझेल कारवर बंदी घालण्याच्या विचारात आहे. या संबंधी प्रस्तावच सरकारने नेमलेल्या एका कमिटीने दिला आहे. काय आहे नेमका तो प्रस्ताव वाचा…
पूर्वी डीझेल आणि पेट्रोलच्या दरात खूप अंतर असायचे त्यामुळे डीझेल कार किंवा चार चाकी वाहने घेण्याकडे लोकांचे प्राधान्य असायचे. डीझेलच दर तेव्हा पेट्रोलच्या तुलनेत कमी होते. डीझेल कार मायलेजही खूप द्यायच्या. आता तसे राहीलेले नाही. तरीही अनेक जणांकडे डीझेलवर धावणारी वाहने आहेत. त्यांच्या संबंधीचा एक निर्णय सरकारने घेण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारने वाढत्या प्रदुषणावर काम करीत आहे. गेल्या 1 एप्रिलपासून देशात नवीन रिअल ड्रायव्हींग इमिशन (RDE ) BS6 फेज-2 नॉर्म लागू झाला आहे. त्यामुळे सर्वत्र नवीन वाहने घेताना ती बीएस – 6 इंजिन श्रेणी दर्जाचीच असावीत असे आहे.
एका पॅनलने ही शिफारस केली
आता त्यापुढचं पाऊल म्हणून साल 2027 पर्यंत डीझेल इंधनावर धावणाऱ्या सर्व प्रकारच्या चार चाकी वाहनांवर बंदी आणण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. अर्थात हा निर्णय सुरुवातीला मोठ्या महानगरांमध्ये लागू करण्याची योजना प्रस्तावित आहे. रॉयटरने दिलेल्या वृत्तानूसार केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या ( OIL MINISTRY ) एका पॅनलने ही शिफारस केली आहे. त्यांनी केंद्र सरकारपढे चार वर्षांनंतर साल 2027 पर्यंत डीझेलवर धावणारी सर्व चार चाकी वाहने बंद करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे प्रदुषण नियंत्रणात मोठा हातभार लागण्याची आशा आहे.
तर या कंपन्याची डीझेल मॉडेल बंद
वाढते प्रदुषण रोखण्यासाठी सध्या सरकारचे ध्यैय सध्या जास्तीत जास्त इल्केट्रीक वाहने आणि बायोफ्युअलवर धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढवण्यावर आहे. सरकारने गेल्या काही वर्षांत या संदर्भात अनेक मोठे निर्णय घेतले आहे. याचसाठी 1 एप्रिल 2023 पासून बीएस 6 श्रेणीची वाहनांची निर्मिती करण्याचे बंधन वाहन उत्पादकांवर घालण्यात आले आहे. इथेनॉल इंधनावरही संशोधन सुरू आहे. जर सरकारने डीझेलवरील वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला तर डीझेल इंधनावर धावणाऱ्या टाटा सफारी, हॅरीयर, टाटा अल्ट्रोज, टाटा नेक्सन, महिंद्र एक्सयूव्ही 300, महिंद्र बोलेरो, महिंद्र बोलेरो निओ या सारख्या आलिशान कारचे डीझेल मॉडेल बंद करावी लागतील.
