इलेक्ट्रीक कारबाबत महत्वाचे संशोधन, जादा अंतर कापता येणार, काय लागला शोध ?

इलेक्ट्रीक कार आणि ड्रोनच्या जगात क्रांती घडणार आहे. संशोधकांनी एक असे तंत्रज्ञान शोधले आहे ज्यामुळे इलेक्ट्रीक मोटरची वजन हलके होणार आहे.

इलेक्ट्रीक कारबाबत महत्वाचे संशोधन, जादा अंतर कापता येणार, काय लागला शोध ?
EV STATION
| Updated on: Jan 15, 2026 | 8:55 PM

वाहतूकीच्या तंत्रात सर्वात आव्हान हे गाड्यांचे वजन कमी करणे हे असते. मग इलेक्ट्रीक कार असो, ड्रोन असो की अंतराळ यान , जेवढे वजन हलके असेल तेवढी बॅटरी जास्त चालणार आणि वाहनाचा वेग अधिक होऊ शकतो. या दिशेने दक्षिण कोरियाच्या इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स एण्ड टेक्नोलॉजी (KIST) च्या संशोधकांना मोठे यश आले आहे. या संशोधनामुळे संपूर्ण जग हैराण झाले आहे.

मोटरमधून तांबे वगळले

आतापर्यंत इलेक्ट्रीक मोटर्स चालवण्यासाठी तांब्याच्या (Copper) कॉईल्सचा वापर केला जातो. तांब्यात करंटच्या कारणामुळे मॅग्नेटिक फिल्ड जनरेट होत असते. ज्यामुळे मोटर काम करते. परंतू तांबे आणि बाहेरील मेटल केसिंगच्यामुळे मोटरचे वजन खूपच जास्त असते. यामुळे इलेक्ट्रीक गाड्यांचे वजनही जास्त वाढते आणि परफॉर्मेन्स घटतो. मात्र, इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स एण्ड टेक्नोलॉजी KIST च्या तंत्रज्ञानांनी तांब्याच्या जागी एका खास मटेरियलचा वापर करुन हलकी मोटर तयार केली आहे.

आता इलेक्ट्रीक मोटर तयार करण्यासाठी कार्बन नॅनोट्युब (CNTs) चा वापर केला आहे. ही  कार्बन नॅनोट्युब लोखंडापेक्षा जास्त मजबूत आणि तांब्याहून अधिक हलके असते. या कार्बन नॅनोट्युब मोटरचे वजन साधारण कॉपर कॉईल मोटरच्या तुलनेत सुमारे 80% पर्यंत कमी होते. संशोधकांनी जेव्हा या मेटल फ्री मोटरचा ट्रायल केला, तेव्हा आढळले की ही मोटर केवळ वीजेला चांगल्याप्रकारे मॅनेज करतेच शिवाय तिची कार्यक्षमता देखील वाढली आहे.

असा लागला शोध

कार्बन नॅनोट्युब मोटर तयार केल्यानंतर सर्वात मोठी अडचण ही होती की यास तयार करताना काही मेटल पार्टिकल्स यात रहात होते. ज्यात यामुळे परफॉर्मेंस घसरत होतो. KIST चे संशोधकांनी लिक्विड क्रिस्टल तंत्राचा वापर करुन एक नवीन प्यूरिफिकेशन प्रोसेस विकसित केली. यास प्रोसेसने कार्बन नॅनोट्युबच्या बनावट नुकसान पोहचू शकते. इम्प्योटिजच्या बाहेर काढून टाकले. याचा निष्कर्ष असा झाला की कंडक्टिविटीत 133 टक्के वाढ झाली आणि मोटरचे वजन 80% पर्यंत कमी झाले.

भविष्यात काय बदल ?

हा शोध कारपर्यंतच मर्यादित राहणार नाही. संशोधकांच्या मते याचा वापर करुन इलेक्ट्रीक कारचे वजन हलके होईल. ज्यामुळे एकदा चार्ज केले की कार दूर अंतरापर्यंत धावू शकणार आहे. तसेच ड्रोन आणि अंतराळ यानाचे वजन देखील कमी करता येणे शक्य आहे. त्यामुळे अंतराळ यानांची पेलोड क्षमता वाढणार आहे. तसेच रोबोट आणि ड्रोनमधील मोटर देखील हलक्या होतील आणि जास्त वेळ चालतील. भविष्यात बॅटरी आणि सेमीकंडक्टरमध्येही या कार्बन तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे.