दहावीचा निकाल लागलाय. कोरोनानंतर झालेल्या दहावीच्या ऑफलाईन परीक्षेचा निकाल लाईव्ह टीव्ही 9 मराठीच्या वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्र 10वीचा निकाल (Maharashtra 10th Result 2022) कधी लागणार, याकडे लाखो विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलेलं होतं. जून शेवटचा आठवडा सुरु झाला रे झाला की तारीख कुठल्याही क्षणी जाहीर होऊ शकते, असं सांगितलं जात होतं. पण जूनच्या तिसऱ्या आठवड्यातच दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यात आला आहे. पालक आणि विद्यार्थीवर्ग कधी रिझल्ट लागतोय याकडे लक्षच लागलंय. अखेर विद्यार्थी आणि पालकांची धाककूद संपली. Maharashtra 10वी निकाल 2022 आज घोषित करण्यात आला. महाराष्ट्र 10वीचा निकाल www.mahahsscboard.in च्या संकेतस्थळावर त्याचबरोबर tv9marathi.com वर पाहाता येऊ शकतो.दहावीचा निकाल पाहायचा कसा? काय आणि कशी प्रोसेस आहे? हे सोप्पं भाषेत स्टेप बाय स्टेप जमजून घ्या…
आमच्या वेबसाईटवर नोंदणी करा आणि रिझल्ट डायरेक्ट मेसेजवर येईल