VIDEO:अर्थसंकल्पाचे भाषण म्हणजे डोंगर पोखरून उंदीरः छगन भुजबळ

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: सिद्धेश सावंत

Updated on: Feb 01, 2022 | 5:47 PM

अर्थसंकल्प सादर करताना दोन दोन तास भाषणं होत असली तरी ते भाषण्यातून नागरिकांना काय फायदा होत नाही. जे आशावादी होऊन अर्थसंकल्पाकाकडे पाहतात त्यांची घोर निराशा झाली आहे.

अर्थसंकल्प सादर करताना दोन दोन तास भाषणं होत असली तरी ते भाषण्यातून नागरिकांना काय फायदा होत नाही. जे आशावादी होऊन अर्थसंकल्पाकाकडे पाहतात त्यांची घोर निराशा झाली असल्याची टीका अन्न, नागरी पुरवठा खात्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.  हे भाषण म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढल्याचा प्रकार आहे. अर्थसंकल्पावर चर्चा होतात, चर्चा होतात, घडवल्या जातात मात्र त्यातून काहीही निष्पण्ण होत नाही. नोटबंदी, जीएसटी आणि कोरोनामुळे देशातील ६० लाख लोकांचे रोजगार गेले आहेत, तरीही हे अश्वासन देत राहतात. सीबी आणि ईडीच्या धाडी टाकून ज्यांच्या संपत्ती जप्त करण्याचे हे अश्वासन देतात ते सगळे पळून गेले आहेत. मग कधी यांची संपत्ती जप्त होणार. ऑनलाईन शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, संरक्षण खात्याचे पैसेही कमी केले आहेत तरी हे सरकार फक्त बोलत राहते.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI