AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Union Budget 2026 : सीए अभय भुतडा यांनी महत्त्वाच्या आर्थिक प्राधान्यांबद्दल व्यक्त केली प्रतिक्रिया

सीए अभय भुतडांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 वर भाष्य केले. आर्थिक वाढ, क्षमता विकास आणि सर्वसमावेशक विकासावर या अर्थसंकल्पाचा भर आहे. बँकिंग सुधारणा, कर सुलभीकरण, एमएसएमईंसाठी 10000 कोटींचा विकास निधी आणि तंत्रज्ञान व डेटा सेंटर्सना चालना देण्याचे निर्णय 'विकसित भारता'साठी महत्त्वाचे ठरतील, असे त्यांचे मत आहे.

Union Budget 2026  : सीए अभय भुतडा यांनी महत्त्वाच्या आर्थिक प्राधान्यांबद्दल व्यक्त केली प्रतिक्रिया
सीए अभय भुतडा
| Updated on: Feb 03, 2026 | 1:28 PM
Share

मुंबई  :  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर केल्यानंतर, उद्योजक आणि समाजसेवक तसेच अभय भुतडा फाउंडेशन व टॅब ग्लोबल व्हेंचर्सचे अध्यक्ष सीए अभय भुतडा यांनी या अर्थसंकल्पातील प्राधान्यांबाबत आपली मतं व्यक्त केली.

कर्तव्य भवनात तयार करण्यात आलेला हा अर्थसंकल्प तीन मुख्य कर्तव्यांवर आधारित आहे. आर्थिक वाढीला गती देत ती दीर्घकाळ टिकवून ठेवणे, लोकांच्या क्षमता आणि आकांक्षांना बळ देणे, तसेच ‘सबका साथ, सबका विकास’ या दृष्टिकोनानुसार सर्वांसाठी संधी उपलब्ध करून देणारा समावेशक विकास सुनिश्चित करणे, हे या अर्थसंकल्पाचे केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी नमूद केले.

बँकिंग, एनबीएफसी सुधारणा आणि कर सुलभीकरण

‘विकसित भारत’च्या दिशेने बँकिंग क्षेत्र पुढील टप्प्यातील वाढीसाठी कितपत सज्ज आहे, याचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बँकिंग समिती स्थापन करण्याच्या प्रस्तावाचे भुतडा यांनी स्वागत केले. तसेच पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशनच्या पुनर्रचनेमुळे सार्वजनिक क्षेत्रातील एनबीएफसींची क्षमता वाढेल, कार्यक्षमता सुधारेल आणि दीर्घकालीन पायाभूत सुविधा वित्तपुरवठ्याला अधिक बळ मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

“कर्जाची मागणी वाढत असताना, आर्थिक स्थैर्य, समावेशकता आणि ग्राहक संरक्षण यांचा समतोल राखणे आर्थिक व्यवस्थेवरील विश्वास टिकवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल,” असे सीए अभय भुतडा यांनी सांगितले. करव्यवस्थेबाबत प्रतिक्रिया देताना भुतडा म्हणाले की, एप्रिल २०२६ पासून लागू होणारा नवा आयकर कायदा, तसेच टीडीएस आणि टीसीएसच्या सुलभ तरतुदी आणि रिटर्न दुरुस्तीसाठी दिलेली वाढीव मुदत, यामुळे अनुपालनातील अडथळे आणि वाद कमी होतील. यामुळे उद्योगांना व्यवसाय करणे अधिक सोपे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एमएसएमईंसाठी पाठबळ आणि भांडवल उपलब्धता

चार्टर्ड अकाउंटंट भुतडा म्हणाले की, ₹१०,००० कोटींचा एसएमई ग्रोथ फंड स्थापन करण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे. या फंडाच्या माध्यमातून वाढीच्या टप्प्यात असलेल्या एसएमईंना आवश्यक असलेले जोखीम भांडवल (उच्च जोखीम व उच्च परतावा देणारे) उपलब्ध होईल. ठरावीक कामगिरीच्या निकषांनुसार हे भांडवल दिले जाणार असून, त्यामुळे सक्षम आणि पुढे जाणाऱ्या ‘चॅम्पियन एसएमई’ घडविण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच सेल्फ रिलायंट इंडिया फंडसाठी करण्यात आलेली अतिरिक्त ₹२,००० कोटींची तरतूद सूक्ष्म उद्योगांसाठी जोखीम भांडवलाचा प्रवाह सुरू ठेवण्यास बळ देणारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये विशेषतः ‘कॉर्पोरेट मित्र’ तयार करण्यासाठी आयसीएआय, आयसीएसआय आणि आयसीएमएआयसारख्या व्यावसायिक संस्थांचा सहभाग घेऊन अल्पकालीन, व्यावहारिक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे भुतडा यांनी अधोरेखित केले. यामुळे लघुउद्योगांमध्ये आर्थिक शिस्त, नियमांचे पालन करण्याची तयारी आणि प्रशासन अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

तंत्रज्ञान, डेटा सेंटर्स आणि जागतिक गुंतवणूक

तंत्रज्ञानाच्या आघाडीवर बोलताना अभय भुतडा म्हणाले की, भारताला जागतिक स्तरावर डेटा आणि डिजिटल सेवांचे केंद्र म्हणून उभे करण्याचा स्पष्ट संदेश हा अर्थसंकल्प देतो. भारतीय डेटा सेंटर्सचा वापर करणाऱ्या परदेशी क्लाऊड सेवा पुरवठादारांना दिलेली करसवलत, तसेच सुलभ केलेले सेफ हार्बर नियम आणि आयटी सेवांसाठी जलद व स्वयंचलित मंजुरी प्रक्रिया, यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक आणि निर्यातीसाठी अधिक आश्वासक वातावरण तयार होईल.

अर्थसंकल्प २०२६-२७ हा आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सुसंगत चौकट देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले. नियामक सुधारणा आणि भांडवल वाटपाशी संबंधित निर्णय प्रभावीपणे राबविले गेले, तर ‘विकसित भारत’च्या उद्दिष्टानुसार शाश्वत विकास साध्य करणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय