AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BUDGET 2022: कर भरतानाची चूकभूल होणार दुरुस्त; चौकशीही नाही, काय आहे नेमकी घोषणा?

अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार आता करदात्यांना गेल्या दोन वर्षांतील चुकांची सुधारणा करण्याची संधीही मिळणार आहे.

BUDGET 2022: कर भरतानाची चूकभूल होणार दुरुस्त; चौकशीही नाही, काय आहे नेमकी घोषणा?
निर्मला सीतारमण, अर्थमंत्री
मनोज कुलकर्णी
मनोज कुलकर्णी | Updated on: Feb 01, 2022 | 2:21 PM
Share

नवी दिल्लीः दरवर्षी नित्यनियमाने प्रामाणिकपणे न चुकता कर भरणाऱ्या सर्वसामान्य करदात्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्प (Central Budget) सादर करताना करदात्यांकडून घाईगडबडीत होणाऱ्या चूकभूल दुरुस्तीमध्ये दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे करदात्यांची होणारी चौकशी आता टळली आहे. आयकर रिटर्न भरताना करदात्यांकडून एखादी चूक झाली, तर यापूर्वी त्यांची चौकशी होत होती. त्यामुळे करदाते वैतागले होते. एकीकडे प्रामाणिकपणे कर भरायचा. त्यात थोडीशीही चूक झाली तर मागे नसते लचांड लागायचे. त्यांची ही अडचण लक्षात घेऊन सरकाराने करदात्यावर अखेर पूर्ण विश्वास टाकला आहे. त्यामुळे अशी चूक झाली तरी त्यांची चौकशी होणार नाही.

दोन वर्षांपर्यंत संधी

अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार आता करदात्यांना गेल्या दोन वर्षांतील चुकांची सुधारणा करण्याची संधीही मिळणार आहे. करदात्यांना चक्क अपडेटेड रिटर्न भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्याही वर्षाच्या शेवटच्या दिवशी पुढील 2 वर्षांपर्यंतचा अपडेटेड रिटर्न करदाते भरू शकतात. म्हणजेच 2021-22 ला रिटर्न भरले. त्यात काही बदल करायचा असल्यास त्यासाठी 2022-23 पर्यंत अपडेटेड रिटर्न भरता येईल.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर सूट

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरील करात सूट दिली जाईल, असे सांगितले. रत्ने आणि दागिन्यांवर कस्टम ड्युटी 5 टक्के करण्यात आली आहे. तर, इमिटेशन दागिन्यांवर कस्टम ड्युटी 400 रुपये प्रति किलो असेल. स्टील भंगारावरील कस्टम ड्युटी आणखी एक वर्षासाठी वाढवली जात आहे. शेतीशी संबंधित मालालाही वीज देण्याची घोषणा यावेळी अर्थमंत्र्यांनी केली.

अर्थमंत्र्यांनी केल्या या घोषणा

– वन मार्केट वन टॅक्स.

– जीएसटीसाठी नामांकित संस्थांची मदत घेणार.

– इमिटेशन ज्वेलरीवरील कस्टम ड्युटी वाढणार.

– पेट्रोलियम रिफायनिंग उत्पादनांवरील कर कमी होणार.

– स्ट्रील स्क्रॅपवरील कर सवलत कालावधी वाढणार.

– हस्तकला उत्पादनांवरील कर कमी राहणार.

– स्टार्ट अप्सना 2022-23 मध्ये कर लाभांश मिळणार.

– लवकरच LIC चा IPO बाजारात आणला जाणार.

– कस्टमच्या नियमात बदल करण्यात येणार.

-रस्ते विकासासाठी पीपीपी मॉडेल वापरणार.

-आठ ठिकाणी रोप वे सुरू करण्यात येईल.

इतर बातम्याः

अर्थव्यवस्थेची दिशा ठरवणारा अर्थसंकल्प आज होणार सादर, कुठल्या क्षेत्राला मिळणार दिलासा याकडे सर्वांचे लक्ष…

Budget 2022 : मनमोहन Vs मोदी सरकार, कोणाच्या काळात करदात्याला दिलासा, कोणामुळे रिकामा झाला खिसा?

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?