AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2024 : दोन दिवसांनी होणार मोठ्या घोषणा, शेअर बाजाराला भरते येणार? गुंतवणूकदारांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे

Share Market : लोकसभा निवडणूक निकालानंतर यंदाचे बजेट एकदम जबरदस्त राहिल असा दावा करण्यात येत आहे. मध्यमवर्गाला या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहे. तर गुंतवणूकदारांना पण अर्थसंकल्पात चमत्कार दिसण्याची आशा आहे.

Budget 2024 : दोन दिवसांनी होणार मोठ्या घोषणा, शेअर बाजाराला भरते येणार? गुंतवणूकदारांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे
शेअर बाजार
| Updated on: Jul 21, 2024 | 5:28 PM
Share

मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत आले आहे. 23 जुलै रोजी, दोन दिवसांनी निर्मला सीतारमण बजेट सादर करतील. या बजेटकडून मध्यमवर्गाला मोठ्या अपेक्षा आहे. त्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर गरीब आणि शेतकऱ्यांसाठी पण मोठा गिफ्ट बॉक्स असू शकतो. दोन दिवसानंतर मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. या घोषणांमुळे शेअर बजाराला भरते येऊ शकते. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. बाजारातील तज्ज्ञांनी शेअर बाजारात काय परिणाम होईल, याविषयीचे मत मांडले आहे.

काय बाजारात येईल घसरण

जेफरीजचे इक्विटी स्ट्रॅटेजीचे मुख्य हेड क्रिस्टोफर वूड यांनी बाजाराविषयी मत मांडले. भारतीय शेअर बाजार अनेक विक्रम करत असला तरी बाजाराला अजून मोठी झेप घ्यायची असल्याचे मत त्यांनी मांडले. कॅपिटल गेन टॅक्समध्ये कोणताही बदल झाल्यास बाजारात घसरण येऊ शकते, 4 जून रोजी लोकसभा निवडणूक निकालानंतर बाजाराने जो सूर पकडला होता, तोच राग बजेटच्या दिवशी आवळल्या जाऊ शकतो.

हे गुंतवणूकदार करतील कमाल

वूड यांच्या मते, सामान्य गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकदार शेअर बाजारात कमाल दाखवू शकतात. ते बाजाराला मजबूत करतील. भाजपला निवडणुकीत फटका बसला असला तरी शेअर बाजारात तेजीचे वार आले. 4 जूननंतर बाजाराने आतापर्यंत 13.3 टक्क्यांची उसळी घेतली. म्हणजे सामान्य गुंतवणुकदारांनी मजबूत गुंतवणूक केल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

बिझनेस टुडेच्या एका वृत्तानुसार, भारतीय शेअर बाजाराचे रुपडे बदलत आहे. त्याचा स्वभाव बदलत आहे. सामान्य गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंडांनी त्यांचा बाजारातील वाटा 16.6 टक्क्यांहून 18.4 टक्के इतका केला आहे. तर विरुद्ध बाजूला परदेशी गुंतवणूकदारांचा वाटा 22.1 टक्क्यांहून 19.9 टक्क्यांवर घसरला आहे.

सरकारने लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला तर बाजारावर परिणाम दिसू शकतो. कॅपिटल गेन टॅक्सकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यात जर वाढ झाली तर बाजार विपरीत प्रतिक्रिया नोंदवू शकतो. पण अशी घोषणा होण्याची शक्यता कमी आहे. मध्यमवर्गावर सवलतींचा पाऊस पडल्यास, पेट्रोल-डिझेलची किंमत, गॅस दरवाढीला लगाम लागल्यास बाजारात आनंदाची लहर येऊ शकते.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.