AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 ते 8 लाखांपर्यंत 5 टक्के कर, 8 ते 12 लाखांपर्यंत 10% आयकर कर, मग 12 लाखांचे उत्पन्न करमुक्त कसे? समजून घ्या संपूर्ण गणित

Nirmala Sitharaman on Income Tax: नवीन कर स्लॅबबद्दल सामान्य माणूस अर्थसंकल्पानंतर थोडा गोंधळलेला दिसत आहे. लोक सोशल मीडियावर प्रश्न विचारत आहेत की नवीन स्लॅब अंतर्गत सरकारने 4 लाख ते 8 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के आयकर लावला आहे.

4 ते 8 लाखांपर्यंत 5 टक्के कर, 8 ते 12 लाखांपर्यंत 10%  आयकर कर, मग 12 लाखांचे उत्पन्न करमुक्त कसे? समजून घ्या संपूर्ण गणित
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 01, 2025 | 4:13 PM
Share

Nirmala Sitharaman on Income Tax: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी मध्यमवर्गीयांना खूश केले. सर्व नोकरदरांना आयकर सुटची मर्यादा वाढवून भेट दिली. 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न त्यांनी आयकरमुक्त केले. तसेच टॅक्‍स स्‍लॅबमध्ये बदल केले. आयकरातील ही सुट नवीन टॅक्स रिजीम पर्याय निवडणाऱ्यांनाच मिळणार आहे. 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होण्याबरोबर 75000 रुपयांचे स्‍टँडर्ड ड‍िडक्‍शन दिले आहे. यामुळे आयकर मुक्त उत्पन्न 12 लाखांवरुन 12.75 लाख रुपये झाले आहे.

2 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर कसा?

नवीन कर स्लॅबबद्दल सामान्य माणूस अर्थसंकल्पानंतर थोडा गोंधळलेला दिसत आहे. लोक सोशल मीडियावर प्रश्न विचारत आहेत की नवीन स्लॅब अंतर्गत सरकारने 4 लाख ते 8 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के आयकर लावला आहे. तसेच 8 लाख ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के आयकर लावला आहे. मग 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य आयकर कसा होता? तर समजवून घेऊ या हे गणित.

असे आहे हे गणित

12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नाचा अर्थ असा आहे की तुम्ही वार्षिक 12.01 लाख रुपये कमावले तरीही तुम्हाला 4 लाख रुपयांपेक्षा जास्त म्हणजेच 8.01 लाख रुपयांच्या संपूर्ण उत्पन्नावर कर भरावा लागेल. नवीन कर स्लॅबनुसार 4.01 लाख ते 8 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के कर आहे. त्यामुळे हे कर 20,000 रुपये होते. त्याचप्रमाणे 8 ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर दहा टक्के 40,000 रुपये कर लागणार आहे. म्हणजेच एकूण 60,000 रुपये आयकर 12 लाखांपर्यंत भरावा लागणार आहे. परंतु तुम्हाला अर्थ मंत्रालयाकडून कलम 87A अंतर्गत सूट दिली जाईल. म्हणजेच तुमचा कर 60000 रुपये आहे आणि तुम्हाला त्यावर सूट मिळेल. हाच फार्मूला सर्व स्लॅबमध्ये लागू असणार आहे. त्यामुळे सर्वांची चांगली बचत होणार आहे.

अशी आहे नवीन टॅक्स स्लॅब-

  • चार लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही
  • 4,00,001 ते 8,00,000 5%
  • 8,00,001 ते 12,00,000 10%
  • 12,00,001 ते 16,00,000 15%
  • 16,00,001 ते 20,00,000 20%
  • 20,00,001 ते 24,00,000 25%
  • 24,00,001 पेक्षा जास्त उत्पन्नावर 30%

हे ही वाचा…

मोदी सरकारची बंपर घोषणा, 20 वर्षांतच एक लाखांपासून 12 लाखांपर्यंत उत्पन्न आयकरमुक्त, कोणत्या वर्षी कोणती झाली घोषणा?

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...