
Nirmala Sitharaman on Income Tax: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी मध्यमवर्गीयांना खूश केले. सर्व नोकरदरांना आयकर सुटची मर्यादा वाढवून भेट दिली. 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न त्यांनी आयकरमुक्त केले. तसेच टॅक्स स्लॅबमध्ये बदल केले. आयकरातील ही सुट नवीन टॅक्स रिजीम पर्याय निवडणाऱ्यांनाच मिळणार आहे. 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होण्याबरोबर 75000 रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन दिले आहे. यामुळे आयकर मुक्त उत्पन्न 12 लाखांवरुन 12.75 लाख रुपये झाले आहे.
नवीन कर स्लॅबबद्दल सामान्य माणूस अर्थसंकल्पानंतर थोडा गोंधळलेला दिसत आहे. लोक सोशल मीडियावर प्रश्न विचारत आहेत की नवीन स्लॅब अंतर्गत सरकारने 4 लाख ते 8 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के आयकर लावला आहे. तसेच 8 लाख ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के आयकर लावला आहे. मग 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य आयकर कसा होता? तर समजवून घेऊ या हे गणित.
12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नाचा अर्थ असा आहे की तुम्ही वार्षिक 12.01 लाख रुपये कमावले तरीही तुम्हाला 4 लाख रुपयांपेक्षा जास्त म्हणजेच 8.01 लाख रुपयांच्या संपूर्ण उत्पन्नावर कर भरावा लागेल. नवीन कर स्लॅबनुसार 4.01 लाख ते 8 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के कर आहे. त्यामुळे हे कर 20,000 रुपये होते. त्याचप्रमाणे 8 ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर दहा टक्के 40,000 रुपये कर लागणार आहे. म्हणजेच एकूण 60,000 रुपये आयकर 12 लाखांपर्यंत भरावा लागणार आहे. परंतु तुम्हाला अर्थ मंत्रालयाकडून कलम 87A अंतर्गत सूट दिली जाईल. म्हणजेच तुमचा कर 60000 रुपये आहे आणि तुम्हाला त्यावर सूट मिळेल. हाच फार्मूला सर्व स्लॅबमध्ये लागू असणार आहे. त्यामुळे सर्वांची चांगली बचत होणार आहे.
हे ही वाचा…