AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2023 : अर्थतज्ज्ञ जे सांगतात, ते ऐकले तर अर्थसंकल्पात सामान्य करदात्यांना बसेल मोठा फटका

आयकराचे नियम सुलभ करण्याची आणि करदात्यांना देण्यात येणारी सर्व सूट काढून टाकण्याची हीच योग्य वेळ आहे.

Budget 2023 : अर्थतज्ज्ञ जे सांगतात, ते ऐकले तर अर्थसंकल्पात सामान्य करदात्यांना बसेल मोठा फटका
कर बचतीचा उपाय
| Updated on: Jan 31, 2023 | 3:04 PM
Share

नवी दिल्ली :  नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी अर्थसंकल्पासंदर्भात (Budget 2023 )काही सूचना केल्या आहेत. त्या सूचनांची अंमलबजावणी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली तर मध्यमवर्गीय व सर्वसामान्य करदात्यांना मोठा फटका बसणार आहे. यामुळे १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे सामान्य करदात्यांचे लक्ष लागले आहे. अर्थात २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. त्यात ‘फिल गुड’चा अनुभव अधिक असेल, अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

काय म्हणतात पानगढिया

अरविंद पानगढिया म्हणतात, आयकराचे नियम सुलभ करण्याची आणि करदात्यांना देण्यात येणारी सर्व सूट काढून टाकण्याची हीच योग्य वेळ आहे. अर्थमंत्र्यांनी हा निर्णय घेतला तर करदात्यांना अनेक प्रकारचे कर लाभ मिळतात, ते सर्व रद्द होणार आहेत. सध्या, 9-10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्ती करातून पुर्ण सुट मिळवू शकतो. तो प्राप्तिकर कायद्याच्या विविध कलमांतर्गत मिळणाऱ्या सर्व कर सवलतींचा पुरेपूर फायदा घेतो. यामुळे त्याचे कर दायित्व जवळजवळ शून्य होते.

ही योग्य वेळ आहे

पनागरिया म्हणाले की, वैयक्तिक आयकरातील सूट संपवण्याची हीच योग्य वेळ आहे. जर सरकार सर्व सवलती काढून टाकू शकत नसेल, तर काही भाग वगळता इतर सर्व सूट काढायला हवी. कॉर्पोरेट टॅक्सच्या बाबतीत सरकारने हे केले आहे. जर सरकारला महसुलावर होणाऱ्या परिणामाची चिंता असेल तर ते 4-5 कर दर लागू करू शकतात. यापुर्वी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष बिबेक देबरॉय यांनीही केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये सूट कमी करण्याची मागणी केली होती.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.