केंद्र सरकारची मोठी घोषणा… रोजगार आणि कौशल्यविकासासाठी पेटारा उघडला; 4 कोटी लोकांना होणार फायदा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आपला सातवा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पातून त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. महिला, तरुण, गरीब आणि अन्नदाता यांच्यावर या बजेटमध्ये अधिक फोकस ठेवण्यात आला आहे. रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासासाठी सरकारने अधिकची तरतूद केली आहे.

केंद्र सरकारची मोठी घोषणा... रोजगार आणि कौशल्यविकासासाठी पेटारा उघडला; 4 कोटी लोकांना होणार फायदा
Nirmala Sitharaman
Image Credit source: संसद टीव्ही
| Updated on: Jul 23, 2024 | 11:36 AM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली आहे. रोजगार आणि कौशल्यविकासाशी संबंधित 5 योजनांसाठी केंद्र सरकारने पेटारा उघडला आहे. या योजनांसाठी दोन लाख कोटींची तरतूद करण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. या योजनांचा एकूण चार कोटीहून अधिक लोकांना फायदा होणार असल्याचंही सीतरामन यांनी स्पष्ट केलं.

केंद्रातील मोदी सरकारचा हा 13 वा अर्थसंकल्प आहे. तर निर्मला सीतारामन याचा हा सातवा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली आहे. रोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाशी संबंधित 5 योजनांसाठी 2 लाख कोटींची तरतूद करण्यात येत आहे. या योजनांतून 4.1 कोटी लोकांना रोजगार आणि कौशल्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची मुदत 5 वर्षासाठी वाढवण्यात आली आहे, अशी माहितीही निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

इकनॉमी चमकत आहे

जागतिक अर्थव्यवस्था अडचणीत आहे. पण भारतीय इकनॉमी चमकत आहे. गरीब, महिला आणि अन्नदाता यांना आम्ही हा बजेट अर्पण करत आहोत. आमच्या सरकारच्या कामांवर लोकांचा विश्वास आहे. भारतात महागाईचा दर 4 टक्के आहे. लोकांनी आमच्या सरकारवर विश्वास दाखवला आहे. लोकांना आमच्या धोरणांवर विश्वास आहे, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

9 प्राधान्य

1. कृषी

2. रोजगार

3. सामाजिक न्याय

4. विनिर्माण आणि सेवा

5. शहरी विकास

6. ऊर्जा सुरक्षा

7. नवाचार

8. अनुसंधान आणि विकास

9. पुढच्या पिढीसाठी सुधारणा

आंध्रप्रदेशसाठी विशेष घोषणा

आंध्रप्रदेश वेगळा झाल्यानंतर राज्यातील नव्या राजधानीसाठी विशेष योजना लागू करण्यात येणार आहे. आंध्रातील प्रकल्प आणि केंद्रातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार कटिब्ध आहे. आंध्रप्रदेशाला अतिरिक्त निधी देण्यात येणार आहे. आंध्रप्रदेशातही इंडस्ट्रीय कॉरिडोअर निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच आंध्रप्रदेशाला 15 हजार कोटी देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

महिलांच्या विकासाठी 3 लाख कोटी

महिलांचा विकास म्हणजे देशाचा विकास आहे, असं सांगतानाच महिलांच्या विकासासाठी 3 लाख कोटीची तरतूद करण्यात येणार आहे.

बिहारला भरभरून

आजच्या अर्थसंकल्पात बिहारला भरभरून निधी देण्यात आला आहे. बिहारमधील रस्ते बांधणीसाठी 26 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच बिहारमध्ये मेडिकल कॉलेजही उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.