Budget 2021 : अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद का नाही? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल

| Updated on: Feb 01, 2021 | 9:10 PM

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर जोरदार हल्ला चढवला आहे. संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीवरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केलाय.

Budget 2021 : अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद का नाही? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल
Rahul Gandhi
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. त्यावर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी या अर्थसंकल्पाचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सडकून टीका केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर जोरदार हल्ला चढवला आहे. संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीवरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केलाय.(Rahul Gandhi questions PM Narendra Modi over the defense sector)

चीनने भारताच्या भूमीवर कब्जा केला आणि आमचे अनेक सैनिक शहीद झाले. पंतप्रधान फोटो ऑपसाठी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. मग त्यांनी जवानांसाठी संरक्षण बजेट का वाढवलं नाही? असा सवाल राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलाय.

अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी किती तरतूद?

2021-22 या आर्थिक वर्षासाठी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी 4 लाख 78 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रासाठी केलेली ही तरतूद मागील अर्थसंकल्पापेक्षा 7 हजार कोटी रुपयांनी अधिक आहे. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी 4 लाख 71 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती. यावर्षी संरक्षण खात्याला जो निधी मिळाला आहे त्यातून 3.38 लाख कोटी रुपये खर्चासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. त्यात पेन्शनचाही समावेश आहे. तर उरलेले 1.40 लाख कोटी रुपये योजनांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत.

सैन्य दलाच्या हिस्स्याला किती निधी?

2.12 लाख कोटी रुपये संरक्षण सेवांवरील खर्चासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. त्यात पगार, परिवहन, रिपेअर, री-फीट, एनसीसी आणि अन्य विभागांचा समावेश आहे. तर लष्कराला 1.48 कोटी, नौदलाला 23 हजार 360 कोटी आणि वायूसेनेला 30 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली आहे. तर ऑर्डनन्स फॅक्ट्री बोर्ड (OFB)ला 113 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. डीआरडीओसाठी 9 हजार कोटी रुपये मिळाले आहे. सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी सरकारने अर्थसंकल्पात 1.35 लाख कोटी रुपये तरतूद केली आङे. मागील वर्षी हा आकडा 1.13 लाख कोटी रुपये होता. या पार्श्वभूमीवर अन्य सर्व मंत्रालयांपेक्षा संरक्षण मंत्रालयासाठी अधिक तरतूद करण्यात आली आहे.

संरक्षणमंत्र्यांकडून पंतप्रधान, अर्थमंत्र्यांचे आभार

केंद्रीय अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी 4 लाख 78 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार मानले आहेत.

संबंधित बातम्या : 

Union Budget 2021 highlights : टॅक्स स्लॅब ते उद्योग व्यापार, काय महाग, काय स्वस्त, अर्थसंकल्प जसाच्या तसा!

Alcolhol Budget 2021: मोदी सरकारनं मद्यप्रेमींचं ‘बसणं’ महाग केलं? वाचा दारु, बिअर महागणार की स्वस्त?

Rahul Gandhi questions PM Narendra Modi over the defense sector