स्वस्त सोने खरेदी करायचंय?, मग त्वरा करा; ‘या’ डेडलाईनपर्यंतच सोने स्वस्तात खरेदी करता येणार!

जर तुम्हालाही सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करण्याची मोठी संधी आहे. (Sovereign Gold Bond Scheme)

स्वस्त सोने खरेदी करायचंय?, मग त्वरा करा; 'या' डेडलाईनपर्यंतच सोने स्वस्तात खरेदी करता येणार!
प्रातिनिधीक फोटो

नवी दिल्ली : सोने-चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार सुरु असतात. जर तुम्हालाही सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करण्याची मोठी संधी आहे. सरकारने येत्या 2021-22 या आर्थिक वर्षासाठी सॉवरेन गोल्ड बाँड या योजनेत गुंतवणूकची सोडत जारी करण्यात येणार आहे. येत्या 17 मे रोजी ही सोडत जाहीर केली जाईल. या गोल्ड बाँडची किंमत प्रति ग्रॅम 4,777 रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे ही किंमत बाजारभावापेक्षा कमी आहे. (Sovereign Gold Bond Scheme 2021-22 How and when to buy)

सॉवरेन गोल्ड बाँडच्या दुसऱ्या सीरीजची सदस्यता 24 मे ते 28 मे रोजी सुरु होईल. या कालावधीतील सदस्यांना 1 जून रोजी सोन्याचे बाँड दिले जातील. यानंतर 31 मेपासून 4 जूनपर्यंत तिसरी आणि 12 जुलै ते 16 जुलैपर्यंत चौथ्या सीरीजची सदस्यता देण्यात येईल. तसेच चौथी सीरीज ही 12 जुलै ते 16 जुलैपर्यंत सुरु होईल. यातील तिसर्‍या मालिकेसाठी बाँडची तारीख 8 जून आहे, तर चौथ्या मालिकेसाठी बॉण्ड 20 जुलै आहे.

वेळोवेळी योजनेत गुंतवणुकीची संधी

सोन्यात गुंतवणूक आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी सरकार वेळोवेळी सॉवरेन गोल्ड बाँडच्या सीरिज जारी करते. याअंतर्गत गुंतवणूकदारांना बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने मिळते. तसेच त्यामध्ये सरकारकडून सुरक्षिततेची पूर्ण हमी दिली जाते. हा बाँड खरेदी करण्यासाठी ग्राहकांना केवायसीचे निकष बाजारपेठेतून सोने खरेदी करण्याप्रमाणेच असतील. सरकारची सॉवरेन गोल्ड बाँड ही योजना नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू झाली.

ऑनलाईन खरेदीवर डिस्काऊंट

गेल्या काही वर्षांपासून सरकार ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सतत नवीन प्रयत्न करत आहे. याअंतर्गत, सरकारने सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांना प्रति दहा ग्रॅम 50 रुपयांची अतिरिक्त सूट दिली जाणार आहे.

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या बाँडची किंमत इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडने जारी केलेली किंमत ही सामान्य सरासरी किंमतीवर आधारित असेल. गुंतवणूकीच्या कालावधीआधी आठवड्याच्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये ही किंमत 99.9 शुद्धतेच्या सोन्याची सरासरी किंमत असते.

4 किलोपर्यंत गुंतवणूकीची संधी

या सरकारी योजनेतंर्गत भारतातील कोणताही नागरिक 4 किलोपर्यंत सोन्यात गुंतवणूक करु शकतो. ही गुंतवणूक बाँडद्वारे केली जाते. म्हणजे यात तुम्हाला सोन्याचे दागिने वैगरे मिळणार नाहीत, त्याचवेळी, ट्रस्ट आणि इतर संस्थांची खरेदीची कमाल मर्यादा 20 किलो ठेवली गेली आहे. (Sovereign Gold Bond Scheme 2021-22 How and when to buy)

संबंधित बातम्या : 

कोरोना संकटातही ‘या’ क्षेत्रातील कर्मचार्‍यांचा पगार दुप्पट वाढला, जाणून घ्या किती फायदा?

Gold Price Today: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीची हीच योग्य वेळ, झटपट तपासा नवे भाव

तुमच्याकडे खासगी नोकरी असल्यास नो टेन्शन, तरीही ‘या’ योजनेतून सरकार देणार पेन्शन

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI