Budget 2023 : ठाकरे गटाकडून अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया, खासदार अरविंद सावंत काय म्हणाले ?

नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मच्या शेवटच्या अर्थसंकल्पावर शिवसेना ठाकरे गटाने पहिली प्रतिक्रिया देत हल्लाबोल केला आहे. यामध्ये खासदार अरविंद सावंत यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर केलेला अर्थसंकल्प म्हणत टीका केली आहे.

Budget 2023 : ठाकरे गटाकडून अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया, खासदार अरविंद सावंत काय म्हणाले ?
Image Credit source: Google
| Updated on: Feb 01, 2023 | 3:11 PM

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचे शेवटचे आणि निर्मला सीतारमण यांनी त्यांचे पाचवा अर्थसंकल्प सादर केला आहे. नरेंद्र मोदी सरकारकडून सात महत्वाच्या मुद्द्यावर संसदेत हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. जवळपास दीड तास अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद सावंत यांनी यावेळी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या शेवटच्या बजेटवर सडकून टीका केली आहे. यामध्ये केंद्रीय अर्थसंकल्प हा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सादर करण्यात आलाचा टोला लगावला आहे तर दुसरीकडे कररचनेत थोडा बदल केलाय त्यानं थोडा दिलासा मिळलाय असं म्हणत अरविंद सावंत यांनी कौतूक केलं आहे.

मोदी सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सादर केलेला अर्थसंकल्पावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी हल्लाबोल केला आहे.

जून्याच योजनांना नवीन नावं दिली आहे अशी टीकाही सावंत यांनी करत महापालिकेचा अर्थसंकल्प आहे की केंद्र सरकारचा असा टोलाही लगावला आहे.

केंद्र सरकारला हे कळायला हवं की दुष्काळ फक्त कर्नाटकात नाही, देशातील विविध भागातही दुष्काळ आहे. महाराष्ट्रात आहे त्याकडे केंद्राला दिसलं नाही का? अशीही टीका सावंत यांनी केली आहे.

निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन एस , एसटी ,ओबीसी योजनांचा दोन तीन वेळा उल्लेख केला आहे अशी प्रतिक्रिया देत अरविंद सावंत यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे.

एकीकडे टीका करत असतांना अरविंद सावंत यांनी कर रचनेत थोडा बदल केलाय त्यानं थोडा दिलासा मिळलाय असंही सावंत यांनी म्हणत एकप्रकारे कौतूक केलं आहे.

आगामी काळात कर्नाटकमध्ये निवडणूका आहे. त्यामध्ये दुष्काळचा अर्थसंकल्पात मुद्दा आल्याने अरविंद सावंत यांनी हा अर्थसंकल्प निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सादर केल्याचा आरोप केला आहे.

याशिवाय आदिवासी मिशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात सिकल आजारांच्या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेली घोषणेवर अरविंद सावंत यांनी टोला लगावला आहे.

भाजपच्या नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर कौतूक केलं जात असतांना सावंत यांनी टीका करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

बजेट 2023 साठी खालील लिंकवर क्लिक करा

अर्थसंकल्प 2023 लाईव्ह टीव्ही

Budget 2023 LIVE : अर्थसंकल्पाच्या पेजवर जाण्यासाठी क्लिक करा

Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या घोषणा आणि परिणाम

Budget 2023 : बजेट 2023 च्या हायलाईटस