Budget 2024: नोकरदारांसाठी मोठे गिफ्ट, पीएफमध्ये मिळणार सरकारकडून घसघशीत भेट, कोणाला होणार फायदा?

Union Budget 2024 nirmala sitharaman: अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आगामी पाच वर्षांत 4.1 कोटी युवकांना रोजगार देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या नोकरदारांना भेट दिली. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त पीएफ दिला जाईल. त्यांच्या एका महिन्यांचा पगार तीन टप्प्यात पीएफमध्ये देण्यात येणार आहे.

Budget 2024: नोकरदारांसाठी मोठे गिफ्ट, पीएफमध्ये मिळणार सरकारकडून घसघशीत भेट, कोणाला होणार फायदा?
| Updated on: Jul 23, 2024 | 11:47 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताच मोरारजी देसाई यांचा विक्रम तोडला. त्यांनी सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी सलग तिसऱ्यांदा मोदी सरकारवर जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. युवा, महिला, गरीब आणि शेतकरी यांच्यावर या अर्थसंकल्पात भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या चार घटकांवर सरकारचे विशेष लक्ष आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सुधारण्यावर आमचा भर असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले.

पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना गिफ्ट

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आगामी पाच वर्षांत 4.1 कोटी युवकांना रोजगार देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तसेच पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या नोकरदारांना भेट दिली. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त पीएफ दिला जाईल. त्यांच्या एका महिन्यांचा पगार तीन टप्प्यात पीएफमध्ये देण्यात येणार आहे. एका लाखापर्यंत पगार असणारे युवक त्यासाठी पात्र ठरणार आहे. जास्तीत जास्त 15,000 रुपये त्या युवकांना देण्यात येणार आहे. या निर्णयाचा फायदा दोन कोटी नवीन कर्मचाऱ्यांना होणार आहे.

विद्यार्थ्यांना 7.5 लाख रुपयांचे मॉडेल स्किल लोन

शासनानेही विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेतली आहे. यासाठी मॉडेल स्किल लोन उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना 7.5 लाख रुपयांचे मॉडेल स्किल लोन मिळेल. 25,000 विद्यार्थ्यांना मॉडेल स्किल लोनचा फायदा होईल. 5 वर्षात 20 लाख तरुणांना कुशल बनवणार आहे. तसेच शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे.

महिलांची कार्यशक्ती वाढवणार

महिलांचा कार्यशक्तीमध्ये सहभाग वाढवण्यावर सरकार भर देणार आहे. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी सांगितले की, वार्षिक 1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना डीबीटी सुविधा मिळेल. याशिवाय पीएम योजनेंतर्गत 20 लाख तरुणांना कुशल केले जाईल. सरकार येत्या 5 वर्षात 20 लाख तरुणांना कौशल्य बनवणार आहे. मुद्रा लोनची मर्यादा वाढवण्यात आली आहे. आता वीस लाखांपर्यंत मुद्रा लोन मिळणार आहे.