BUDGET EXPECTATION SENIOR CITIZEN : यंदाच्या बजेटकडून निवृत्ती वेतनधारकांच्या काय आहेत अपेक्षा?

| Updated on: Jan 28, 2022 | 7:49 PM

ध्याच्या जगात तुटपुंज्या पेन्शनमध्ये भागत नाही. याशिवाय वैद्यकीय खर्चातही मोठी वाढ झालीय. सरकारनं ज्येष्ठ नागरिकांना सुविधा देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात गुंतवणूक करावी आणि करातून दिलासा द्यावा, एवढंच स्वप्न बजेटकडून ओमप्रकाश यांचं आहे.

BUDGET EXPECTATION SENIOR CITIZEN : यंदाच्या बजेटकडून निवृत्ती वेतनधारकांच्या काय आहेत अपेक्षा?
यंदाच्या बजेटकडून निवृत्ती वेतनधारकांच्या काय आहेत अपेक्षा?
Follow us on

मुंबई : पुण्यातील (Pune) निवृत्त शिक्षक (Retired teacher) ओमप्रकाश कोरोनाचं (Covid 19) संकट लवकर दूर व्हावं यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. कोरोना काळात गेल्या दोन वर्षांपासून त्यांचं निवृत्तीनंतरचं नियोजन बिघडलंय आणि बचत योजनांनाही मोठा फटका बसलाय. आता जवळपास दोन वर्ष झालेत, तरीही कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या वर्षी बजेटमध्ये (Budget) निवृत्त वेतनधारकांसाठी (Pensioner) कोणतीही विशेष तरतूद नव्हती. मात्र, यंदाच्या बजेटकडून त्यांना मोठी अपेक्षा आहे. निवृत्तीनंतरचं जीवन जगण्यासाठी पुणे हे सर्वात चांगलं शहर मानलं जातं. निवृत्तीनंतर चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी देशातील इतर ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे ओमप्रकाश बचत करतात. गेल्या काही वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांना बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ओमप्रकाश यांना पेन्शन मिळत असल्यानं त्यांना इतर सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. मात्र, बजेटमधील तरतुदीमुळे बचत आणि गुंतवणुकीवर मोठा परिणाम होतो. कुटुंबाची जबाबदारी पाहता त्यांना मिळणारं पेन्शन पुरेसं नाही. त्यामुळे त्यांना बचत आणि गुंतवणुकीतून दर महिना चांगलं रिटर्न देणारी योजना हवी आहे. कोरोनाच्या संकटामुळे निवृत्तीनंतर काम करण्याची योजनाही त्यांनी बारगळावी लागली. (What are the expectations of retirees from this year’s budget)

भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे

एका अहवालानुसार भारतात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सतत वाढत आहे. 2031 पर्यंत ज्येष्ठ नागरिकांची संख्या 19.4 कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. एकूण लोकसंख्येत ज्येष्ठ नागरिकांची संख्या 41 टक्के एवढी असणार आहे. 2011 च्या जनगणनेनुसार देशात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 10.3 कोटी थी, एकूण लोकसंख्येत हेच प्रमाण 8.6 टक्के होतं.

मागच्या बजेटमध्ये काय मिळालं ?

गेल्या बजेटमध्ये 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना इनकम टॅक्स रिटर्न दाखल न करण्याची सूट मिळाली. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकाचं जीवन फक्त पेन्शन आणि बचतीवरील मिळणाऱ्या व्याजावर अवलंबून आहे. त्यांना आयकर रिटर्न भरण्याची गरज नाही. मात्र, इनकम टॅक्सचं कलम 194 पी नुसार बँक 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचं टीडीएस कट करेल. 60 वर्षांवरील सर्वच नागरिकांना ज्येष्ठ नागरिक म्हणतात. सर्वच ज्येष्ठ नागरिकांच्या बचतीवर मिळणाऱ्या उत्पन्नातून टॅक्स वजा केला जातो. सामान्य व्यक्तींसाठी अडीच लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न टॅक्समुक्त आहे. अडीच लाख ते पाच लाख रुपयांपर्यंत 5 टक्के टॅक्स द्यावा लागतो. सध्या सरकार अडीच ते पाच लाख रुपयांच्या उत्पन्नावर 12,500 रुपयांची सूट देते. त्यामुळे पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स लागत नाही. दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सूटचा पर्याय देखील उपलब्ध नाही. त्यांनाही इतर नागरिकांप्रमाणेच पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरच सूट मिळते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना

सरकारच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन प्रमुख योजना आहेत. प्रधानमंत्री वय वंदन योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजेच SCSS. प्रधानमंत्री वय योजनेअंतर्गत 60 वर्षांवरील सर्वच ज्येष्ठ नागरिक 31 मार्च 2023 पर्यंत 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. गुंतवणुकीच्या आधारावर ज्येष्ठ नागरिकांना 1000 रुपयांपासून 9250 रुपयांपर्यंत पेन्शन दिली जाते. यासोबतच ज्येष्ठ नागरिक बचत योजनेतही 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात . 60 वर्षांनतरही ज्येष्ठ नागरिकांना नियमित उत्पन्न मिळावं हाच बचत योजनांचा मूळ उद्देश आहे. बचत योजनेतून 7.4 टक्के वार्षिक व्याज मिळतो आणि 80 सी नुसार करापासून सूटही मिळते.

आर्थिक तज्ज्ञ काय म्हणतात ?

कर आणि गुंतवणूक सल्लागार बलवंत जैन सांगतात सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीसाठी विशेष योजना नाही. ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि प्रधानमंत्री वय वंदन योजना ह्या फक्त दोनच योजना आहेत. दोन्ही योजनेत 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणुकीची मर्यादा आहे. गुंतवणुकीच्या मर्यादेत वाढ करणे गरजेचे आहे. सामान्य व्यक्तींप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचं 3 लाखांपर्यंतचं उत्पन्नच करमुक्त आहे. मात्र, सूट इतर व्यक्तींप्रमाणेच 5 लाखांच्या उत्पन्नावरच मिळते. सूट मिळण्याची मर्यादाही 6 लाख रुपयांपर्यंत वाढवली पाहिजे. तर ज्येष्ठ नागरिकांना योग्य सन्मान मिळेल.

बस्स, एवढंच स्वप्न आहे

सरकारनं ज्येष्ठ नागरिकांना गुंतवणुकीतून चांगलं उत्पन्न देणारी योजना आणावी, अशी ओमप्रकाश यांची बजेटकडून अपेक्षा आहे. सध्याच्या जगात तुटपुंज्या पेन्शनमध्ये भागत नाही. याशिवाय वैद्यकीय खर्चातही मोठी वाढ झालीय. सरकारनं ज्येष्ठ नागरिकांना सुविधा देण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात गुंतवणूक करावी आणि करातून दिलासा द्यावा, एवढंच स्वप्न बजेटकडून ओमप्रकाश यांचं आहे. (What are the expectations of retirees from this year’s budget)

इतर बातम्या

Budget 2022 : सेकेंड हँड वाहने स्वस्त होणार? Used Cars वरील GST दर कमी करण्याची ऑटोमोबाईल डीलर्सची मागणी

Budget 2022 : दुचाकी स्वस्त होणार? GST कमी करण्याची ऑटोमोबाईल डीलर्सची मागणी