एका लाखाचे बनले दीड कोटी! ‘या’ म्युच्युअल फंडामुळे गुंतवणूकदार बनले मालामाल

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हे सर्वात सुरक्षित मानले जाते. यामुळे अनेक लोक मालामाल बनले आहेत. आज आपण एका म्युच्युअल फंड योजनेची माहिती जाणून घेणार आहोत, ज्यात एका लाखाचे दीड कोटी रुपये बनले आहेत.

एका लाखाचे बनले दीड कोटी! या म्युच्युअल फंडामुळे गुंतवणूकदार बनले मालामाल
mutual fund
| Updated on: Jun 05, 2025 | 7:33 PM

भारतातील अनेक मध्यवर्गीय लोक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत आहेत. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हे सर्वात सुरक्षित मानले जाते. यामुळे अनेक लोक मालामाल बनले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात चढ-उतार सुरू आहे. सेन्सेक्स ८१,००० हजारांच्या आसपास व्यव्हार करत आहे. तर निफ्टी ५० ही २४ हजारांच्या आसपास व्यव्हार करत आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्येही थोडाफार बदल होताना दिसत आहे. आज आपण एका म्युच्युअल फंड योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एका लाखाचे बनले दीड कोटी

फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंडने गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. हा फंड सप्टेंबर १९९४ मध्ये लाँच झाला होता. या फंडाने बँकांमध्ये २७.७० टक्के, टेलिकॉममध्ये ८.२९ टक्के, फार्मा आणि बायोटेकमध्ये ५.११ टक्के आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ४.२० टक्के गुंतवणूक केलेली आहे. तसेच फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंडने लाँच झाल्यापासून वार्षिक १८ टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे जर एखाद्या गुंतवणूकदाराने फंड लाँच झाला त्यावेळी फक्त १ लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे १.५८ कोटी रुपये बनले असते.

गेल्या ५ वर्षात चांगला परतावा

फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंडने गेल्या एका वर्षात सुमारे ९.२८ टक्के, गेल्या ३ वर्षात १९.०८ टक्के, गेल्या ५ वर्षात २७.४० टक्के, गेल्या १० वर्षात १३.९६ टक्के आणि गेल्या १५ वर्षात १४.६७ टक्के असा जबरदस्त परतावा दिला आहे. याचाच अर्थ या फंडाने १ वर्षात १ लाख रुपयांची गुंतवणूक १,०९,२८० रुपये, ३ वर्षात १,६९,०३० रुपये, ५ वर्षात ३,३५,७९० रुपये, १० वर्षात ३,६९,७६० रुपये आणि १५ वर्षात ७,८०,५४० रुपयांपर्यंत वाढली असती. या फंडामळे आतापर्यंत अनेक लोकांना चांगला आर्थिक फायदा झालेला आहे.

टीप – वरील लेखात दिलेली माहिती ही केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हे आर्थिक जोखमीचे काम आहे. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा. वरील लेख वाचून एखाद्याने गुंतवणूक केल्यास, आणि त्याला आर्थिक फटका बसल्यास टीव्ही ९ मराठी जबाबदार असणार नाही.