Stock Market Holidays: दिवाळीनिमित्त या आठवड्यात दोन दिवस शेअर बाजार बंद, वाचा मुहूर्त ट्रेडिंगबद्दल सविस्तर!

या आठवड्यात दोन दिवस शेअर बाजार (Stock Market) बंद राहणार आहे. 4 ते 5 नोव्हेंबरला दिवाळीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे. बीएसईच्या स्टॉक मार्केट हॉलिडे कॅलेंडरनुसार, या दिवशी इक्विटी, डेरिव्हेटिव्ह आणि एसएलबी सेगमेंटमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत.

Stock Market Holidays: दिवाळीनिमित्त या आठवड्यात दोन दिवस शेअर बाजार बंद, वाचा मुहूर्त ट्रेडिंगबद्दल सविस्तर!
शेअर बाजार
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 11:42 AM

मुंबई : या आठवड्यात दोन दिवस शेअर बाजार (Stock Market) बंद राहणार आहे. 4 ते 5 नोव्हेंबरला दिवाळीनिमित्त शेअर बाजार बंद राहणार आहे. बीएसईच्या स्टॉक मार्केट हॉलिडे कॅलेंडरनुसार या दिवशी इक्विटी, डेरिव्हेटिव्ह आणि एसएलबी सेगमेंटमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत. मात्र, मुहूर्त ट्रेडिंग (Muhurat Trading) 4 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दिवाळीच्या दिवशी मुहूर्त ट्रेडिंग होते. शेअर बाजाराला सुट्टी असली तरी मुहूर्ताच्या ट्रेडिंगसाठी बाजारात फक्त एक तासाचा व्यवहार होतो. या एका तासात गुंतवणूकदार आपली गुंतवणूक करतात.

मुहूर्त ट्रेडिंगच्या वेळा

शेअर बाजारात 4 नोव्हेंबर 2021 रोजी दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता एका तासासाठी 15 मिनिटांचा विशेष मुहूर्त ट्रेडिंग असेल (Diwali Muhurat Trading). एक्स्चेंजच्या मते, दिवाळीच्या मुहूर्ताचे ट्रेडिंग हे संध्याकाळी 6:00 ते 6:08 पर्यंत प्री-ओपन ट्रेडिंग सत्र असेल. यानंतर संध्याकाळी 6.15 ते 7.15 या वेळेत मुहूर्त ट्रेडिंग होईल.

मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय?

दिवाळीला नवीन वर्षाची सुरुवात होते. यावेळी संवत 2077 ची सुरुवात दिवाळीने होणार आहे. भारतीय परंपरेनुसार देशाच्या अनेक भागांमध्ये दिवाळी नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात देखील करते. या शुभ मुहूर्तावर शेअर बाजारातील व्यापारी विशेष शेअर ट्रेडिंग करतात. म्हणूनच याला मुहूर्त ट्रेडिंग असेही म्हणतात.

पैसे कमावण्याची मोठी संधी

मुहूर्ताच्या दिवशी शेअर बाजारात पैसे गुंतवणे शुभ मानले जाते. विशेषत: श्रीमंत लोक या दिवशी नक्कीच गुंतवणूक करतात. अशा परिस्थितीत छोट्या गुंतवणुकीवर ते लाखो रुपये कमावतात. दिवाळीच्या विशेष मुहूर्तावर व्यापार सुरू करून गुंतवणूकदार नवीन आर्थिक वर्षासाठी शुभेच्छा देतात. मुहूर्ताचा व्यवहार हा पूर्णपणे परंपरेशी निगडित असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या :

स्वप्नांच्या शहरात स्वप्नातलं घर, गोरेगावात एकूण 787 कोटींचे फ्लॅट्सही विक्री, लॅविश लाईफ, हायप्रोफाईल सुविधांना प्रचंड प्रतिसाद

Dhanteras 2021: सोने खरेदी करताना आवर्जून ‘हा’ नियम लक्षात ठेवा नाहीतर धनत्रयोदशीला पोलिस येतील घरी!

Gold Price : आनंदाची बातमी! धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर

(2 days holiday on the stock market for Diwali)