AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय करायचा आहे का? या योजनेतून होणार 20 लाख रुपयांचा आरामात बंदोबस्त

नोकरीच्या त्रासाला कंटाळून अनेक जण स्वत:चा व्यवसाय करण्याचा प्रयत्नात असतात. पण आर्थिक स्थिती नसल्याने आणि कर्ज घेतलं तर व्याजाचं टेन्शन सतावत असतं. त्यामुळे काही जण फक्त स्वप्न म्हणून पाहात असतात. पण तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर 20 लाखांपर्यंत तुम्हाला सरकारकडून मदत मिळू शकते.

नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय करायचा आहे का?  या योजनेतून होणार 20 लाख रुपयांचा आरामात बंदोबस्त
| Updated on: Feb 07, 2025 | 7:20 PM
Share

नोकरी करताना अनेक बंधनं येतात आणि स्वत:ला हवं तसं प्रोजेक्ट करता येत नाही. त्यामुळे काहीतरी स्वत:चं असायला हवं असं प्रत्येकाला वाटतं. छोटा काही होईना आपल्या व्यवसाय आपणच करायचा असा मानस असतो. पण आर्थिक स्थिती आणि कर्ज मिळेल की नाही या चिंतेत अनेक जण विचार करूनच माघार घेतात. पण तुमच्याकडे चांगली आयडिया असेल तर चिंता करू नका. कारण व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारच तुम्हाला पैसा देईल. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत (PMMY) सरकार कोलॅट्रल फ्री लोन देते. हे कर्ज नॉन कॉर्पोरेट आणि बिगर कृषी कारणांसाठी दिलं जातं. या सरकारी योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करू शकता. या योजनेच्या माध्यमातून पूर्वी 10 लाखांपर्यंत कर्ज दिलं जात होतं. पण मागच्या अर्थसंकल्पात यात भरीव वाढ करून मर्यादा 10 लाखांवरून ही मर्यादा 20 लाख केली आहे. या योजनेत तरुण प्लसची नवीन श्रेणी जोडली असून 20 लाखापर्यंत कर्ज घेता येईल. विशेष म्हणजे हे कर्ज तारणमुक्त आहे आणि त्यावर कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जात नाही. तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज घ्यायचं असेल तर कोणत्याही सरकारी किंवा खासगी बँकेतून घेऊ शकता. प्रादेशिक ग्रामीण बँक, लघू वित्त बँक, बिगर वित्तीय कंपन्यांमध्ये कर्जासाठी अर्ज करू शकता. चला जाणून कर्जाच्या योजना आणि टप्पे..

  • शिशु कर्ज- 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं.
  • किशोर कर्ज – 5 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं.
  • तरुण कर्ज- 10 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं.
  • तरुण प्लस- 20 लाखापर्यंत कर्ज दिलं जातं. (पण तरुण श्रेणीत कर्ज घेऊन ते फेडल्यानंतरच या योजनेचा लाभ मिळतो. )

तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असलात तरी, मुद्रा योजनेद्वारे कर्ज घेऊ शकता. कर्जाची एकूण परतफेड कालावधी 12 महिने ते पाच वर्षांपर्यंत आहे. पण तुम्ही कर्ज पाच वर्षांत परतफेड करू शकत नसाल तर तुम्ही त्याचा कालावधी आणखी पाच वर्षांनी वाढवू शकता. सर्वात चांगली बाब म्हणजे मंजूर कर्जाच्या संपूर्ण रकमेवर तुम्हाला व्याज आकारला जात नाही. पण मुद्रा कार्डद्वारे काढलेल्या आणि खर्च केलेल्या रकमेवरच व्याज आकारला जातो. श्रेणीनुसार व्याजदर बदलतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतीय नागरिक असावं. लाभ घेणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असावं. बँकेचा डिफॉल्ट इतिहास नसावा. ज्या व्यवसायासाठी मुद्रा लोन घ्यायचं आहे, ती कॉर्पोरेट संस्था नसावी.

असं करा मुद्रा योजनेसाठी अर्ज

सर्वात प्रथम मुद्रा योजनेच्या अधिकृत mudra.org.in या वेबसाईटवर जा. होम पेजवर तीन प्रकारच्या लोनचे पर्याय दिसतील. यात शिशु, किशोर आणि तरुण योजनेपैकी एकाची निवड करा. यानंतर नवं पेज ओपन होईल. त्यावरून अर्ज डाऊनलोड करा आणि प्रिंट काढा. अर्ज व्यवस्थितरित्या भरा. यावेळी आधारकार्ड, पॅनकार्ड, व्यवसायाचा पत्ता सांगणारं दस्ताऐवज, इनकम टॅक्स रिटर्न आणि सेल्फ टॅक्स रिटर्न कॉपी, पासपोर्ट साईज फोटो वगैरे लावा. त्यानंतर हा फॉर्म जवळच्या बँकेत जमा करा. बँक अर्जाची छाननी करे आणि 1 महिन्याच्या आत तुम्हाला लोन देईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी युजर नेम आणि पासवर्ड तयार करावा लागेल. त्यानंतर मुद्रा लोन वेबसाईटवर लॉगिन करा आणि ऑनलाईन अर्ज करू शकता.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी