AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24, 22 की 18 कॅरेट गोल्ड, गुंतवणूक आणि दागिन्यांसाठी कोणते सोने बेस्ट?

आता सोन्यात गुंतवणूक कधीही फायद्याची असते. परंतू कोणते सोने चांगले 24 कॅरेट, 22 कॅरेट की 18 कॅरेट ? हे देखील महत्वाचे असते.

24, 22 की 18 कॅरेट गोल्ड, गुंतवणूक आणि दागिन्यांसाठी कोणते सोने बेस्ट?
gold rate market
| Updated on: Sep 15, 2025 | 10:34 PM
Share

सोने खरेदी नेहमीच लोकांना लाभ देणारी असते. मग दागिन्यांच्या स्वरुपात असो की गुंतवणूक म्हणून. परंतू अनेकांना कन्फ्युजन असते की कोणते सोने बेस्ट असते. 24 कॅरेट, 22 कॅरेट की 18 कॅरेट ? 24 कॅरेटचे सोने हे सर्वात शुद्ध म्हटले जाते. परंतू ते रोजच्या वापरासाठी चांगले असते का ? काय असते हे कॅरेटचे गणित, वाचा…

22 कॅरेट सोने संतुलित असते परंतू ते गुंतवणूकीसाठी चांगले असते का ? आणि 18 कॅरेट डिझाईन – फ्रेंडली आहे. परंतू रिटर्न कसे देईल. या गोष्टी महत्वाच्या असतात. आता सणासुदीचे दिवस आहेत. सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. आज आपण पाहूयात गरज आणि बजेटनुसार कोणते सोने तुमच्यासाठी स्मार्ट चॉईस ( Gold Investment )  होऊ शकते.

24, 22 या 18 कॅरेट, तिघांमध्ये फरक काय ?

कॅरेट –  शुद्धता  मजबूती आणि  टिकाऊपणा

24 कॅरेट – सुमारे 99.9 टक्के शुद्ध सोने यात असते. कोणत्याही इतर धातूच्या मिश्रणाचे प्रमाण खूपच कमी असते. हे सोने खूपच नरम असते. या सोन्याचे दागिने तुटण्याचा, खरचटण्याच्या वा झिजण्याची शक्यता अधिक असते. रोजच्या वापरासाठी कमी उपयुक्त

22 कॅरेट – सुमारे 91.6 टक्के + सुमारे 8.4 टक्के अन्य धातू ( तांबे, चांदी ) यांचा समावेश. 24 कॅरेटची तुलनेत जास्त मजबूत असते. रोजच्या वापरासाठी चांगले. हलके वजन असल्याने केव्हाही घालता येते.

18 कॅरेट – सुमारे 75% सोने + 25% अन्य धातूचे मिश्रण असते. सर्वात मजबूत आणि टीकाऊ असते. दैनंदिन वापरासाठी,कोरीव डिझाईनच्या दागिन्यांसाठी सर्वोत्तम पर्याय असते

तिन्ही दर्जाच्या सोन्याच्या ?

24 कॅरेट- 1,09,511 रुपये प्रति 10 ग्राम

22 कॅरेट- 1,00,312 रुपये प्रति 10 ग्राम

18 कॅरेट- 82,133 रुपए प्रति 10 ग्राम

( किंमती सोमवार सायं. 6 वाजेपर्यंत IBJA ( इंडिया बुलियन एण्ड ज्वेलर्स एसोसिएशननुसार )

तिघांमध्ये सर्वोत्तम कोणते ?

जर तुम्ही अंत्यत सुंदर पिवळे धमक दागिने हवे असतील, जास्त चमकणारे आणि हलके कानातले, पेंडेंट वगैरे घालण्यासाठी दागिने हवे असतील तर 24 कॅरेटचे दागिने सुंदर दिसतील.

जर रोज घालण्यासाठी दागिने हवे असतील तर उदा. बांगड्या, अंगठ्या ज्या कामकाज करताना, हाथ धुताना खराब होऊ नयेत असे वाटत असेल तर 22 कॅरेटची दागिने मध्यम स्वरुपाचे म्हणून चांगले ठरतील.

जर दागिने एकदम कोरीव डिझाईनचे आणि रोज घालण्यासाठी हवे असतील आणि खराब होऊ नयेत असे वाटत असेल तर 18 कॅरेट तुमच्यासाठी उत्तम आहे. सोने व्यापाऱ्याच्या मते प्रत्येक कॅरेट त्याच्या जागी उत्तम आहे. सणासुदीचा मोसम, तुमचे बजेट आणि दागिन्यांची सवय आणि उपयोग हे ध्यानात घेऊन दागिने खरेदी करावेत. जर तुम्ही गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करत असाल तर शुद्धता महत्वाची असते. परंतू रोजचा वापरासाठी त्याची मजबूती आणि बजेटही महत्वाचे ठरते.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...