Big announcement | 5G बाबत लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता, पुढच्या महिन्यात होणार लिलाव?

Big announcement | 5G बाबत लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता, पुढच्या महिन्यात होणार लिलाव?
5G बद्दल लवकरच मोठी घोषणा होण्याची चर्चा
Image Credit source: tv 9

5G बद्दल लवकरच मोठी घोषणा होण्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. सरकार 5G स्पेक्ट्रम लिलावाच्या तारखा जाहीर करू शकते. तसेच ही प्रक्रिया पुढील दोन महिन्यांत पूर्ण केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. जाणून घेऊया 5G वर सरकारची योजना काय आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 25, 2022 | 3:44 PM

भारताने आपला पहिला 5G व्हॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉल केला आहे. म्हणजेच 5G नेटवर्कचे लाँचिंग आता फार दूर नसल्याची चर्चा सुरु झालेली आहे. त्यामुळे साहजिकच प्रश्न येतो, की भारतात कधीपर्यंत हे लाचिंग (Launch update) होउ शकते. दरम्यान, 5G नेटवर्क सुरू करण्यापूर्वी, सरकारला त्याच्या स्पेक्ट्रमचा लिलाव करावा लागणार आहे. स्पेक्ट्रम लिलाव (Spectrum auction) आणि 5G च्या किमती निश्चित झाल्यानंतरच त्याचे कमर्शिअल रोलआउट (Commercial rollout) शक्य होईल. असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे 5G स्पेक्ट्रम लिलाव लवकरच करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एका माहितीनुसार, दूरसंचार विभाग जूनच्या सुरुवातीला स्पेक्ट्रम लिलावाच्या तारखा जाहीर करू शकते.

5G सुविधा कधीपर्यंत?

मे संपत आला असल्याने 5G चे लाँर्चिंगसाठी फार वेळ लागणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ET रिपोर्टनुसार, दूरसंचार विभागाने 5G स्पेक्ट्रम लिलावाबाबत कॅबिनेट नोट जारी केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ पुढील बैठकीत याबाबत निर्णय घेऊ शकते. ट्रायने लिलावासाठी एअरवेव्हचे मूल्य 7.5 लाख कोटी रुपये ठेवले आहे. तर दुसरीकडे, दूरसंचार विभाग पुढील दोन महिन्यांत लिलाव प्रक्रिया पूर्ण करेल, अशी माहिती आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार 15 ऑगस्ट 2022 रोजी 5G च्या कमर्शियल रोलआउटबाबत मोठी घोषणा करू शकेल.

हे सुद्धा वाचा

या आहेत अडचणी

5G नेटवर्कचा रोलआउट आता फार दूर राहिलेला नाही. पण तरीही त्याच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. कारण टेलीकॉम इंडस्ट्री स्पेक्ट्रमच्या किमतीवर खूश नसल्याचे वृत्त आहे. COAI (Cellular Operators Association of India) ने देखील ट्रायच्या सूचनेवर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घ्यायचा आहे. आता दूरसंचार उद्योगाला दिलासा देण्यासाठी सरकार काही निर्णय घेते का, हे पाहावे लागेल. मात्र, ट्रायच्या सूचनेविरुद्ध सरकार कोणताही निर्णय घेईल, अशी शक्यता कमी आहे. उद्योगांना आशा आहे, की त्यांच्यासाठी फायदेशिर असलेला निर्णय सरकार 5G स्पेक्ट्रम लिलावाबाबत घेईल. दरम्यान, ट्राईने 20 वर्षे आणि 30 वर्षांसाठी सूचना दिल्या आहेत. सूचनेनुसार, 30 वर्षांसाठी देण्यात येणार्‍या स्पेक्ट्रमची किंमत 20 वर्षांसाठी विकल्या जाणाऱ्या स्पेक्ट्रमच्या 1.5 पट असावी.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें