AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारकडून बम्पर गिफ्ट

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकार एकच नाही तर चार चार गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी 8 व्या वेतन आयोगाची मागणी केली आहे. त्यांचे मन वळविण्यासाठी केंद्र सरकारने मोठी खेळी खेळली आहे.

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारकडून बम्पर गिफ्ट
| Updated on: Jul 27, 2023 | 4:49 PM
Share

नवी दिल्ली | 27 जुलै 2023 : देशात महागाईचे (Inflation) आकडे सतावणारे आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांना जीवनशैलीनुसार, मेट्रो शहरातील खर्च परवडत नाही. महागाईने ते मेटाकुटीला आले आहेत. कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी 8 व्या वेतन आयोगाची (8th Pay Commission) मागणी केली आहे. पण त्यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण येईल. देशभरात एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आहेत. त्यांना नाराज करुन चालणार नाही. त्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकार एकच नाही तर चार चार गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. 7 व्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) ही खास भेट मिळणार आहे. त्यांचे मन वळविण्यासाठी केंद्र सरकारने मोठी खेळी खेळली आहे.

DA-DR मध्ये वाढ

केंद्र सरकार देशातील एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना दिलासा देईल. त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करेल. AICPI Index च्या आकड्यानुसार, महागाई भत्ता (DA Hike) आणि महागाई दिलासा (DR Hike) यामध्ये 4 टक्क्यांची वाढ होईल. त्यामुळे सध्याच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होईल. 42 हून 46 टक्क्यांवर महागाई भत्ता होईल. पगारात वार्षिक 8,000 ते 27000 रुपयांपर्यंत वाढ होईल.

घरभाडे सवलतीत वाढ

महागाई भत्त्यात वाढ होईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाऊस रेंट अलाऊंन्समध्ये (House Rent Allowance) वाढ होऊ शकते असे वाटते. घरभाडे सवलतीत 3 टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना थेट फायदा होईल.

फिटमेंट फॅक्टरचा फायदा

अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी आणि त्यांच्या संघटना फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत. मीडियातील वृत्तानुसार, केंद्र सरकार त्यांच्या मागणीवर विचार करु शकतात. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 2.57 टक्क्यांच्या हिशोबाने फिटमेंट फॅक्टरचा लाभ मिळाला. कर्मचारी हा भत्ता 3.68 टक्के करण्याची मागणी करत आहे. असे झाले तर कर्मचाऱ्यांचा मुळ पगार 18,000 रुपयांहून 26,000 रुपये होईल.

थकीत रक्कम मिळेल

कोरोना काळात महागाई भत्ता रोखण्यात आला होता. हा भत्ता मिळण्यासाठी कर्मचारी संघटनांनी मागणी केली आहे. केंद्र सरकार हा महागाई भत्ता देण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जानेवारी 2020, जून 2020 आणि जानेवारी 2021 साठी डीएममध्ये एकरक्कमी 17 टक्के वाढीचा निर्णय घेतला होता. पण त्याकाळी रोखून धरलेली रक्कम दिली नाही. कर्मचारी संघटना केंद्र सरकारकडे 18 महिन्यांच्या डीए एरियरची मागणी करत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2,00000 रुपयांपर्यंतचा फायदा होईल.

असा निश्चित होतो डीए

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ग्राहक किंमत निर्देशांकावर निर्धारीत होतो. प्रत्येक महिन्याच्या शेवटी तो जाहीर करण्यात येतो. त्याआधारे महागाई भत्त्याचे गणित मांडण्यात येते. CPI(IW)BY2001=100 मार्चच्या 134.2 अंकांच्या तुलनेत मे महिन्यातील आकडा 134.7 अंक राहीला. यामध्ये 0.50 अंकांची भर पडली.

Follow Us
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?