7th pay commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 1 जुलैपासून वाढणार?

| Updated on: Jun 27, 2021 | 7:55 AM

7th pay commission | केंद्रीय अर्थसचिव टी.व्ही. सोमनाथन यांच्या हस्ताक्षरातील एक चिठ्ठीचा दाखला दिला जात होता. यामध्ये नमूद केले होते की, सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असलेले भत्ते म्हणजे DA आणि DR 1 जुलैपासून पुन्हा सुरु करण्यात येतील.

7th pay commission: सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 1 जुलैपासून वाढणार?
money
Follow us on

नवी दिल्ली: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातील डियरनेस अलाऊन्स (DA) आणि डियरनेस रिलीफ (DR) हे भत्ते वाढवण्यासंदर्भात शनिवारी दिल्लीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता आणि थकबाकी देण्याविषयीही बरीच चर्चा झाली. मात्र, अनेक तासांच्या चर्चेनंतरही काही ठोस निर्णय होऊ शकला नव्हता. परंतु, या बैठकीनंतर सोशल मीडियावर केंद्र सरकार 1 जुलैपासून कर्मचाऱ्यांचा पगार आणि भत्ते वाढवणार असल्याच्या पोस्टस व्हायरल होऊ लागल्या होत्या. (7th pay commission fake viral message on social media about salary components increase)

त्यासाठी केंद्रीय अर्थसचिव टी.व्ही. सोमनाथन यांच्या हस्ताक्षरातील एक चिठ्ठीचा दाखला दिला जात होता. यामध्ये नमूद केले होते की, सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित असलेले भत्ते म्हणजे DA आणि DR 1 जुलैपासून पुन्हा सुरु करण्यात येतील. तसेच हे भत्ते प्रलंबित असल्यामुळे गेल्या दीड वर्षापासून केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सची जमा झालेली थकबाकीही अदा केली जाईल. केंद्र सरकार तीन टप्प्यात ही थकबाकी देईल, असे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना उत्साहाचे भरते आले होते. परंतु, काही वेळानंतर #PIBFactCheck मध्ये ही चिठ्ठी बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

केंद्र सरकारने अद्याप कर्मचाऱ्यांचा भत्ता किंवा थकबाकीसंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेऊ नये, असे PIB कडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा :

7th Pay Commission : दहा हजार ग्रेड पे सरकारी कर्मचाऱ्याला जवळपास 2.88 लाखाचं नुकसान

7th Pay Commission : काय आहे Pay Matrix ज्याने सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार?

7th Pay Commission : सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना जुलैपासून वाढीव वेतन! काय फायदा होणार?

(7th pay commission fake viral message on social media about salary components increase)