7th Pay Commission News: 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 60 लाख निवृत्तीवेतनधारकांची प्रतीक्षा संपली, सप्टेंबरपासून येणार वाढीव पगार

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना महागाई भत्ता 1 जुलैपासून 28 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश अर्थ मंत्रालयाने दिलेत.

7th Pay Commission News: 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 60 लाख निवृत्तीवेतनधारकांची प्रतीक्षा संपली, सप्टेंबरपासून येणार वाढीव पगार
7th Pay Commission
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 10:16 PM

नवी दिल्लीः 7th Pay Commission Latest News: गेल्या दीड वर्षांपासून प्रतीक्षा करत असलेल्या 52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 60 लाख निवृत्तीवेतनधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना महागाई भत्ता 1 जुलैपासून 28 टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश अर्थ मंत्रालयाने दिलेत.

महागाई भत्त्याचा दर मूलभूत वेतनाच्या 17 टक्क्यांवरून 28 टक्के

केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचा दर 1 जुलैपासून 11 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. आता तो 17 टक्के होता जो वाढून 28 टक्के झाला आहे. अर्थ मंत्रालयांतर्गत खर्च विभागाच्या कार्यालयीन निवेदनात असे म्हटले आहे की, 1 जुलैपासून कर्मचार्‍यांना महागाई भत्त्याचा दर मूलभूत वेतनाच्या 17 टक्क्यांवरून 28 टक्के करण्यात येणार आहे.

हा नियम असैन्य कर्मचार्‍यांनाही लागू होणार

या वाढीमध्ये 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 या कालावधीत अतिरिक्त हप्त्यांचा समावेश असेल. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, हा आदेश संरक्षण सेवांच्या अंदाजातून पगार घेत असलेल्या असैन्य कर्मचार्‍यांनाही लागू होईल. सशस्त्र सेना आणि रेल्वेच्या कर्मचार्‍यांसाठी संबंधित मंत्रालयांकडून स्वतंत्र आदेश जारी केले जातील.

एचआरए देखील 27% करण्यात आलाय

महागाई भत्त्यासंदर्भातील वाढीच्या घोषणेनंतर केंद्र सरकारनेही घरभाडे भत्ता (HRA) मध्ये 27 टक्के वाढ केली. वस्तुतः खर्च विभागाने 7 जुलै 2017 रोजी एक आदेश जारी केला होता, ज्यामध्ये असे म्हटले होते की जेव्हा महागाई भत्ता 25 टक्के ओलांडेल तेव्हा घरभाडे भत्ता सुधारित केला जाईल. 1 जुलैपासून महागाई भत्ता 28 टक्क्यांपर्यंत वाढला, त्यामुळे घरभाडे भत्ताही सुधारित करण्यात आला.

“X” श्रेणीच्या शहरांसाठी HRA ची वाढ 27%

पुनरावृत्तीनंतर “X” श्रेणी शहरांसाठी एचआरए मूलभूत वेतनाच्या 27% असेल. त्याचप्रमाणे, “Y” वर्गातील शहरांसाठी ते मूलभूत वेतनाच्या 18 टक्के आणि “Z” श्रेणी शहरांसाठी हे मूलभूत वेतनाच्या 9 टक्के असेल. सध्या तिन्ही वर्गासाठी हे 24 टक्के, 16 टक्के आणि 8 टक्के आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रवर्गासाठी घरभाडे भत्ता 1-3 टक्क्यांनी वाढविण्यात आलाय.

Total Transport Allowance = TA + [(TA x DA% )/100]

याशिवाय महागाई भत्त्यातील वाढीचा थेट परिणाम वाहतुकीच्या भत्त्यावरही होईल आणि त्यातही वाढ झाली आहे. परिवहन भत्ता टीपीटीए प्रवर्गाच्या आधारे उपलब्ध आहे. दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू, गाझियाबाद, बृहत्तर मुंबई, हैदराबाद, जयपूर, पटना अशी शहरे उच्च टीपीटीए प्रकारात येतात. याखेरीज उर्वरित शहरे इतर शहरांत येतात. टीपीटीए कर्मचार्‍यांच्या विविध स्तरांसाठी निश्चित केले गेले आहेत, ज्यावर महागाई भत्ता जोडून कर्मचार्‍यांना परिवहन भत्ता मोजला जातो.

संबंधित बातम्या

Pension Fundच्या नियमांत मोठा बदल, आता पेन्शनच्या पैशांची गुंतवणूक IPO आणि स्टॉक मार्केटमध्ये होणार

‘या’ कंपनीनं गुंतवणूकदारांचे भविष्यच बदलले, वर्षभरात 1 लाखांचे करून दिले 5 लाख

7th Pay Commission News: 52 lakh central employees and 60 lakh pensioners wait, Finance Ministry issues order

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.