AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adani Share : अदानी ग्रुप ठरला जादुई चिराग! 101 दिवसांत कमावले 8500 कोटी, कोण आहे हा बाजीगर

Adani Share : अदानी ग्रुप या व्यक्तीसाठी जादूच्या दिव्यापेक्षा कमी ठरला नाही. कारण अवघ्या 101 दिवसांत या व्यक्तीने 8500 कोटी कमावले आहेत. कोण आहे हा नशीबवान गुंतवणूकदार

Adani Share : अदानी ग्रुप ठरला जादुई चिराग! 101 दिवसांत कमावले 8500 कोटी, कोण आहे हा बाजीगर
कमाईच कमाई
| Updated on: May 23, 2023 | 4:35 PM
Share

नवी दिल्ली : जीवनात योग्य वेळी योग्य निर्णय घेणे जबरदस्त फायदेशीर ठरते. काही असंच या व्यक्तीच्या बाबतीत घडलं. त्याला अदानी ग्रुप हा (Adani Group) अलादीनच्या जादुई दिव्यासारखाच हाती लागला. योग्य वेळी केलेली गुंतवणूक राजीव जैन यांना हजारो कोट्यवधींची मालक करुन गेली. अमेरिकी शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्गच्या (Hindenburg Report) अहवालानंतर गुंतवणूकदारांनी अदानी समूहाच्या शेअरची विक्री करण्याचा सपाटा लावला. त्यावेळी 7 वर्षे जुनी असलेली गुंतवणूक फर्म GQG Partners चे सहसंस्थापक राजीव जैन (Rajiv Jain) यांनी अदानी ग्रुपमध्ये गुंतवणुकीचा मोठा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला.

101 दिवसांत 8500 कोटींची कमाई तर राजीव जैन यांनी मोक्का साधला. त्यांनी ही संधी शोधली आणि तिचं सोनं केलं. अदान समूहाच्या भवितव्याविषयी तज्ज्ञ अंदाज बांधत असतानाच आणि गुंतवणूकदार शेअर विक्री करत असताना जैन यांनी गुंतवणुकीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. त्यांना अदानी समूहातील गुंतवणुकीतून केवळ 101 दिवसांत जवळपास 8500 कोटींचा फायदा झाला.

15,446 कोटी रुपयांची केली गुंतवणूक राजीव जैन यांनी अदानी समूहातील 4 कंपन्यांमध्ये 15,446 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. राजीव यांनी अदानींच्या 4 शेअरमध्ये, अदानी इंटरप्राईजेस, अदानी पोर्टस आणि स्पेशल इकोनॉमिक झोन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रांसमिशनमध्ये गुंतवणूक केली. अदानींच्या सर्वच शेअरमध्ये तेजीचे सत्र असल्याने सध्या त्यांच्या या गुंतवणुकीचे मूल्ये पण वधारले आहे. या गुंतवणुकीचे बाजारातील मूल्य जवळपास 24 हजार कोटी रुपये आहे. अदानी समूहात या पडत्या काळात ज्यांनी गुंतवणूक केली. त्यांना प्रचंड फायदा झाला.

सुप्रीम दिलासा सुप्रीम कोर्टाच्या विशेष समितीच्या अहवालानंतर अदानी समूहाला मोठा दिलासा मिळाला होता. समूहाच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर तुफान तेजीत आहे. सोमवार आणि आज मंगळवारी तेजीचे सत्र कायम होते. काल पण हे शेअर 19 टक्क्यांनी वधारले. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष समितीने अदानी समूहाच्या शेअरमधील भावात कोणतीच गडबडी नसल्याचा अहवाल दिला होता. याविषयीचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आला. सेबीच्या तपासातही काहीच हाती लागले नसल्याचे समोर आले आहे.

अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये तेजीचे सत्र अदानी विल्मर, अंबुजा सिमेंट, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी टोटल गॅसमध्ये 5 टक्क्यांपर्यंत तेजी दिसून आली. कालही या शेअरमध्ये अपर सर्किट लागले होते. एनडीटीव्ही आणि एसीसी सिमेंटमध्ये तेजी दिसून आली. या तेजीच्या सत्रामुळे अदानी समूहाच्या 10 सूचीबद्ध कंपन्यांचे संयुक्त बाजार मूल्यांकन 10,16,212.15 कोटी रुपयांवर पोहचले आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?