AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8th Pay Commission: नवीन वेतन आयोगानंतर शिपायाचा पगार वाचून धक्काच बसेल! सीईओ, मॅनेजरपेक्षाही अधिक कमाई

8th Pay Commission Salary: नवीन वेतन आयोगाविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे. त्यानुसार, शिपायाचा पगारच खासगी कंपनीतील सीईओ आणि मॅनेजरच्या तोडीस तोड राहण्याची शक्यता आहे.

8th Pay Commission: नवीन वेतन आयोगानंतर शिपायाचा पगार वाचून धक्काच बसेल! सीईओ, मॅनेजरपेक्षाही अधिक कमाई
आठवा वेतन आयोगImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 09, 2026 | 12:00 PM
Share

देशातील अनेक शहरात आठव्या वेतन आयोगाची (8th Pay Commission) बैठक होत आहे. आयोगाच्या सदस्यांना कर्मचारी संघटना आणि पेन्शनर्स विविध राज्यात भेट घेत आहेत. त्यांच्यासमोर मागण्या आणि निवेदन देत आहेत. यानंतर आयोग एक मोठा अहवाल तयार करेल. सरकारच्या मंजूरीनंतर 8 व्या वेतन आयोग वेतन वाढीविषयी घोषणा करेल. आज मंगळवारी 9 सप्टेंबर रोजी चेन्नईत आयोगाची बैठक होत आहे. या बैठकीनंतर मोठी अपडेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान एक शिपायाचे वेतन नवीन वेतन आयोगानंतर किती वाढेल याविषयी एक अंदाज वर्तवला गेला आहे.

CEO, मॅनेजरपेक्षा शिपायाचे वेतन अधिक?

8 व्या वेतन आयोगानुसार वेतन वाढ झाली तर एक सरकारी शिपायाची मासिक कमाई ही  एखाद्या छोट्या कंपनीतील सीईओ आणि मॅनेजरच्या तोडीची राहण्याची शक्यता आहे. शिपायाचा पगार इतका वाढेल की एमबीए पदवीधर आणि खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षा ते अधिक असेल. मोठ्या महाविद्यालयातून पदवी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार नाही इतके पॅकेज शिपायाला असेल.

किती असेल शिपायाचे वेतन?

सध्याचा विचार करता, ग्रुप-डी म्हणजे स्तर 1 चे कर्मचारी, शिपायाचे मूळ वेतन 18,000 रुपये इतके आहे. 8 व्या वेतन आयोगात पगार वाढताच तो 46,260 इतका होईल. त्यात डीए आणि इतर भत्यांचा समावेश नाही. हे सर्व जोडल्यास पगार हा 50000 च्या पुढे जाईल, अथवा तो लाखांच्या घरातही जाईल. जर 7 व्या वेतन आयोगाचा फॉर्म्युला पुन्हा लागू झाला, म्हणजे 2.57 पट फिटमेंट फॅक्टर लागले, तर हा आकडा सर्वसामान्यांच्या कल्पनेपलिकडे जाईल. अर्थात याविषयीची कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

8 व्या वेतन आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर ठरलेला नाही. अनेक कर्मचारी संघटनांनी फिटमेंट फॅक्टर 3.83 पर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे.पेन्शनर्स असोसिएशनने मागणी केली आहे की महागाई भत्ता (DA/DR) वाढून 25% करावा. डीए, डीआर मूळ वेतनात जमा करावा अशी सुद्धा मागणी करण्यात येत आहे. 7 व्या वेतन आयोगाने 3 सदस्यीय कुटुंब ग्राह्य धरले होते. आता ही सदस्यसंख्या पाच युनिट करण्याची मागणी होत आहे. आई-वडिलांचाही समावेश कुटुंबात करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्याचे आई-वडीलच नाही तर सासू-सासऱ्यांचाही त्यात समावेश असावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Follow Us
राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका!
MNS | राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका! नेमकं कारण काय?
धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक...
Sanjay Raut | धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक; चिन्ह गोठवण्याची केली मागणी
तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे..
Manoj Jarange Patil Andolan | तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे पाटलांचा भरत गोगावले यांना थेट इशारा
गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्...
Ganpati Idol Collapsed | गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्, पुढे जे झालं...
DJच्या आवाजावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या! सण साजरे करा, पण...
Amruta Fadnavis | DJच्या आवाजावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या! सण साजरे करा, पण...
ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! हाकेंची मोठी घोषणा
Laxman Hake | ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; पुढे म्हणाले...
धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ...
Corporator's Funds | मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ; 60 लाखांऐवजी आता मिळणार तब्बल...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान!
Rohit Pawar | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान! अजितदादांच्या गटाने भाजपची साथ सोडली तर...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस...
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस; सरकारचा मोठा निर्णय