AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today : आठवडभरात हजाराची घसरण, आजचा सोने-चांदीचा भाव काय

Gold Silver Price Today : आठवडभरात सोन्यात एक हजार रुपयांची घसरण झाली. तर चांदी 4 हजार रुपयांनी गडगडली. आजचा भाव काय आहे जाणून घ्या.

Gold Silver Price Today : आठवडभरात हजाराची घसरण, आजचा सोने-चांदीचा भाव काय
स्वस्ताईचा मुहूर्त
| Updated on: May 19, 2023 | 9:01 AM
Share

नवी दिल्ली : अमेरिकन डॉलरच्या दबावामुळे सोने-चांदी (Gold Silver Price) खरेदीदारांना मोठी पर्वणी मिळाली आहे. मे महिन्यात सोने-चांदीला मोठी उसळी घेता आलेली नाही. सोन्याने 62,000 रुपयांचा टप्पा ओलांडला असला तरी सोने 65,000 रुपयांचा टप्पा गाठण्याची शक्यता मावळली आहे. चांदीने 78,000 रुपयांचा टप्पा गाठला होता. पण त्यापुढे चांदीला मजल मारता आलेली नाही. आठवडाभरात सोने एक हजाराने तर चांदी जवळपास 4 हजार रुपयांनी गडगडली. खरेदीदारांना स्वस्तात खरेदीची संधी मिळाली आहे. अमेरिकन डॉलरचा दबाव असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने-चांदीचे भाव नरमले आहे.

आठवड्यात एक हजारांची घसरण 10 मे रोजी 22 कॅरेट सोने 57,100 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. तर 24 कॅरेट सोने 62,280 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. मध्यंतरी दोनदा भावात 100,150 रुपयांची वाढ झाली. पण आठवडाभरात सोन्यात एक हजारांची घसरण दिसून आली. 18 मे रोजी 22 कॅरेट सोने 56,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेटचा भाव 61,350 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 19 मे रोजी सकाळच्या सत्रात भावात कोणताच बदल दिसून आला नाही. गुडरिटर्न्सने जाहीर केलेल्या किंमतीनुसार हे भाव आहेत.

24, 23, 22 कॅरेटचा भाव ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,474 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,232 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,394 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,356 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.

चांदीची घसरगुंडी ibjarates.com नुसार, आज चांदीच्या किंमतीत मोठा बदल झाला नाही. 18 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 71,808 रुपये होता. 16 मे रोजी संध्याकाळी हा भाव 71,930 रुपये होता. एक किलो चांदीचा भाव 15 मे रोजी 72,455 रुपये होता. तर गुडरिटर्ननुसार, 1 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये होता. तर 6 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,250 रुपये होता. त्यानंतर घसरण कायम आहे. चांदीत जवळपास चार हजारांची घसरण झाली.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान