संपूर्ण मुंबईत मेट्रोचे जाळे उभे राहिले असते, अदानी यांनी दिला सरकारला इतका कर

Adani Group tax in FY25: दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांनी सरकारला मोठा टॅक्स दिला आहे. या करामुळे सरकारच्या तिजोरीत चांगलीच वाढ झाली आहे. अदानी ग्रुपने 74,945 कोटी रुपयांची रक्कम दिली आहे. या रक्कमेत मुंबईत मेट्रो नेटवर्क बनवले गेले असते.

संपूर्ण मुंबईत मेट्रोचे जाळे उभे राहिले असते, अदानी यांनी दिला सरकारला इतका कर
| Updated on: Jun 05, 2025 | 2:07 PM

देशातील तिसरे सर्वात मोठे उद्योगपती अदानी ग्रुपने आर्थिक वर्ष 2024-25 दरम्यान सरकारला मोठा कर दिला आहे. अदानी ग्रुपने 74,945 कोटी रुपयांचा कर सरकारला दिला असून मागील वर्षाच्या तुलनेत तो 29% जास्त आहे. यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कराचा समावेश आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षा निधीचाही समावेश आहे. मागील वर्षी म्हणजे सन 2023-24 या आर्थिक वर्षात गौतम अदानी यांनी 58,104 कोटी रुपयांचा कर सरकारला दिला होता.

अदानी ग्रुपने केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, कंपनीच्या लिस्टेड कंपन्यांच्या माध्यमातून कराची भरणा करण्यात आली आहे. त्यातील 28,720 कोटी रुपये थेट कराच्या माध्यमातून जमा करण्यात आले आहे. तसेच 45,407 कोटी रुपये इनडायरेक्ट कर म्हणून दिला आहे. उर्वरित 818 कोटी रुपयांची रक्कम इतर माध्यमातून दिली आहे. अदानी ग्रुपच्या लिस्टेड कंपनीत अदानी एंटरप्राइजेज, अदानी पावर, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकनॉमिक झोन, अदानी टोटल गॅस, अदानी एनर्जी सॉल्यूशन्स, अदानी ग्रीन एनर्जी आणि अंबूजा सिमेंटचा समावेश आहे.

संपूर्ण मुंबईत झाले असते मेट्रो नेटवर्क

अदानी ग्रुपच्या सात कंपन्यांशिवाय ग्रुपच्या अन्य तीन लिस्टेड कंपन्या एनडीटीव्ही, एसीसी आणि सांघी इंडस्ट्रीजचा समावेश आहे. कराची भरणा केल्यानंतर अदानी ग्रुपने ‘Basis of Preparation and Approach to Tax’ नावाने एक डॉक्यूमेंट प्रसिद्ध केले आहे. या डॉक्यूमेंटमध्ये ग्रुपच्या सात कंपन्यांची माहिती वेबसाइटवर दिली आहे. त्यात अदानी ग्रुपकडून भरण्यात आलेला ग्लोबल टॅक्स आणि इतर निधीसंदर्भातही माहिती दिली आहे.

74,945 कोटी रुपयांची ही रक्कम खूप मोठी आहे. या रक्कमेत मुंबईत मेट्रो नेटवर्क बनवले गेले असते. मेट्रोचा हा नेटवर्क लाखो लोकांसाठी फायदेशीर ठरला असता. तसेच या पैशांमध्ये देशात आधुनिक ऑलम्पिक खेळाचे आयोजन करता आले असते. सन 2036 ऑलम्पिक खेळाच्या यजनाम पदासाठी भारत सरकार बोली लावण्याच्या तयारीत आहे. या खेळाच्या आयोजनावर 34,700 कोटी ते 64,000 कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे.