AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BPCL नंतर आता मोदी सरकार ‘या’ दोन सरकारी खत कंपन्या विकणार; 1,200 कोटी कमावणार

या शेअर विक्रीतून सरकारला 1,200 ते 1500 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळू शकतात. अधिकारी म्हणाले की, सरकार RCF मधील 10 टक्के हिस्सा आणि NFL मध्ये 20 टक्के हिस्सा ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे विकणार आहे.

BPCL नंतर आता मोदी सरकार 'या' दोन सरकारी खत कंपन्या विकणार; 1,200 कोटी कमावणार
| Edited By: Vaibhav Desai | Updated on: Aug 29, 2021 | 2:20 PM
Share

नवी दिल्लीः सरकारकडे नॅशनल केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड(RCF) आणि नॅशनल फर्टिलायझर्स लि. (NFL) या दोन खत कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत विकले जाऊ शकतात. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिलीय. या शेअर विक्रीतून सरकारला 1,200 ते 1500 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे मिळू शकतात. अधिकारी म्हणाले की, सरकार RCF मधील 10 टक्के हिस्सा आणि NFL मध्ये 20 टक्के हिस्सा ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे विकणार आहे.

या शेअर विक्रीतून सरकारला 1,200 ते 1,500 कोटी रुपये मिळू शकतात. या शेअर विक्रीसाठी मर्चंट बँकर्सची आधीच नियुक्ती करण्यात आलीय. अधिकारी म्हणाले की, सरकारने खत क्षेत्रासाठी घेतलेल्या पावलांमुळे येत्या काही महिन्यांत शेअर्सचे मूल्यांकन सुधारू शकते.

RCF आणि NFL मध्ये सरकारचा किती हिस्सा?

शुक्रवारी RCF चे शेअर्स 72.25 रुपये आणि NFL चे शेअर्स 53.95 रुपये BSE वर बंद झाले. सरकारचा सध्या एनएफएलमध्ये 74.71 टक्के आणि आरसीएफमध्ये 75 टक्के वाटा आहे.

निर्गुंतवणुकीतून 1.75 लाख कोटी उभारण्याचे लक्ष्य

सरकारने 2021-22 मध्ये निर्गुंतवणुकीद्वारे 1.75 लाख कोटी रुपये उभारण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवलेय. गेल्या आर्थिक वर्षात सरकारने निर्गुंतवणुकीतून 38,000 कोटी रुपये उभारले होते. चालू आर्थिक वर्षात सरकारने आतापर्यंत अॅक्सिस बँक, एनएमडीसी लिमिटेड आणि हडकोमधील भागविक्रीद्वारे 8,300 कोटी रुपये उभारलेत.

25% भागधारक असणे आवश्यक

सेबीच्या नियमांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांसाठी किमान 25 टक्के सार्वजनिक भागधारक असणे आवश्यक आहे. सध्या 19 पीएसयू आहेत, जिथे सरकारला वाव आहे. सरकारने खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीच्या प्रक्रियेस गती देण्यासाठी 4 फेब्रुवारी 2021 रोजी नवीन PSE धोरण लागू केले होते. या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम धोरणात्मक आणि गैर-रणनीतिक श्रेणींमध्ये विभागले गेलेत. सरकार सार्वजनिक क्षेत्रातील आणखी 10 उपक्रमांमध्ये निर्गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. यासाठी संपूर्ण खासगीकरणाचा मार्ग स्वीकारला जाऊ शकतो किंवा सरकार किमान सार्वजनिक भागधारक नियमांनुसार त्यात आपला हिस्सा ठेवेल. मिळालेल्या माहितीनुसार, NLC, KIOCL, SJVN, HUDCO, MMTC, GIC आणि New India Insurance या 7 सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांवर चर्चा झालीय. असे मानले जाते की, 2021-22 ते 2023-24 या आर्थिक वर्षात सरकार आणखी तीन सार्वजनिक उपक्रमांसह निर्गुंतवणुकीकडे वाटचाल करेल.

संबंधित बातम्या

सरकार शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये देणार, फक्त एवढे छोटे काम करा

CNG-PNG देखील आजपासून महाग, दिल्लीसह कोणत्या शहरात किती किंमत?

After BPCL, now the Modi government will sell two government fertilizer companies; 1,200 crore

Follow Us
इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा निर्णय; पदाधिकाऱ्यांन
Omraje Nimbalkar | इकडे उद्धव ठाकरेंचा दौरा तिकडे निंबाळकरांचा मोठा डाव; पदाधिकाऱ्यांना...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून...
भाजपमध्ये आतल्याआतच मोठं घडतंय? बड्या नेत्याचं पद जाईल म्हणून... उद्धव ठाकरेंनी सांगितली इनसाईड स्टोरी
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील
इतिहास आहे, इकडचे खासदार काही वर्षांनी.. संजय जाधवांच्या मतदारसंघातील दौऱ्यापूर्वीच उद्धव ठाकरेंचे विधान
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...