AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Foxconn Investment : Vedanta शी घेतली फारकत, फॉक्सकॉनचा असा आहे मोठा प्लॅन

Foxconn Investment : वेदांताशी फारकत घेतल्यानंतर तैवानची कंपनी फॉक्सकॉन आता जोमाने कामाला लागली आहे. सेमीकंडक्टरसोबतच ही कंपनी इतर उत्पादनात ही आगेकूच करणार आहे.

Foxconn Investment : Vedanta शी घेतली फारकत, फॉक्सकॉनचा असा आहे मोठा प्लॅन
| Updated on: Jul 28, 2023 | 1:47 PM
Share

नवी दिल्ली | 28 जुलै 2023 : तैवान कंपनी फॉक्सकॉन इलेक्ट्रिक उत्पादने आणि सेमीकंडक्टरसाठी प्रसिद्ध आहे. एप्पल कंपनीचा फोन हीच कंपनी तयार करते. ही कंपनी भारतात सेमीकंडक्टर प्रकल्प विस्तार करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी कंपनीने वेदांतासोबत करार केला होता. फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्पाची (Foxconn-Vedanta Project) पायाभरणी गुजरात राज्यात झाली होती. नुकतीच फॉक्सकॉनने या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पातून माघार घेतली. या कंपनीने 19.5 अब्ज डॉलरचा करार मोडीत काढला. वेदांताशी फारकत घेतल्यानंतर तैवानची कंपनी फॉक्सकॉन आता जोमाने कामाला लागली आहे. सेमीकंडक्टरसोबतच ही कंपनी इतर उत्पादनात ही आगेकूच करणार आहे.

या राज्यात उभारणार प्रकल्प

फॉक्सकॉनची सहकंपनी भारतात इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स प्रकल्प उभारत आहे. जागतिक वृत्तसंस्था रॉयटर्सच्या एका अहवालानुसार, कंपनी सध्या 200 दशलक्ष डॉलरपर्यंत गुंतवणूक करणार आहे. तामिळनाडू सरकारसोबत त्यासाठी कंपनी करार करण्याच्या तयारीत आहे. प्राथमिक बोलणी झाली असून तामिळनाडूत यापूर्वीच कंपनीचा एक प्रकल्प सुरु आहे.

चर्चेची पहिली फेरी पूर्ण

राज्य सरकारने या वृत्ताला दुजोरा दिला. फॉक्सकॉन इंडस्ट्रियल इंटरनेटचे (FII) सीईओ ब्रांड चेंग आणि या कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात भेट दिली. तामिळनाडूमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही टीम आली होती. त्यांनी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांशी बोलणी केली.

180-200 दशलक्ष गुंतवणुकीचे लक्ष्य

FII कम्युनिकेशन्स, मोबाइल नेटवर्क आणि क्लाउड कम्प्युटिंग इक्विपमेंट्सची निर्मिती करते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू सरकारसोबत चर्चेची प्राथमिक फेरी पूर्ण झाली आहे. त्यानुसार कंपनी 180-200 दशलक्ष गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. पुढील वर्षात, 2024 पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वीत करण्याचा फॉक्सकॉनचा आग्रह आहे.

काय होईल उत्पादन

प्रकल्प उभारल्यानंतर अधिक गुंतवणुकीची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या योजनेविषयी अजूनही विस्तृतपणे काही बाहेर आलेले नाही. या प्रकल्पातील उत्पादनाचा वापर iPhones वा इतर कंपन्यांच्या उत्पादनात करण्यात येऊ शकतो.

तामिळनाडूमध्ये अगोदरच एक प्रकल्प

फॉक्सकॉन पूर्वीपासूनच तामिळनाडूमध्ये आहे. चेन्नईत कंपनीची मोठी फॅक्टरी आहे. यामध्ये Apple कंपनीच्या iPhones ची जोडणी होते. त्यामुळे नवीन गुंतवणूक पूर्वीच्या प्रकल्पाशेजारीच केल्यास उत्पादन आणि वाहतूक खर्चात कपात होईल. कंपनीचा फायदा होईल.

सेमीकंडक्टर प्लँट

याशिवाय फॉक्सकॉन गुजरात सरकारसोबत चर्चा करत आहे. वेदांताशी फिस्कटल्यानंतर फॉक्सकॉन गुजरातमध्ये सेमीकंडक्टर प्लँट उभारण्याच्या तयारीत आहे. दक्षिणेतील राज्य कर्नाटकात पण एक कंपनी सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी 1.07 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.