AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Foxconn Vedanta Deal : फॉक्सकॉनचे घुमजाव, पंतप्रधानांच्या स्वप्नांना मोठा झटका

Foxconn Vedanta Deal : सेमीकंडक्टर हब होण्याच्या भारताच्या स्वप्नांना मोठा झटका बसला. चीनला शह देण्यासाठी पंतप्रधानांनी हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याचा विरोधकांचा आरोप होता. पण आता या प्रकल्पाचेच भविष्य आंधारात लोटल्या गेले.

Foxconn Vedanta Deal : फॉक्सकॉनचे घुमजाव, पंतप्रधानांच्या स्वप्नांना मोठा झटका
| Updated on: Jul 11, 2023 | 1:46 PM
Share

नवी दिल्ली : सेमीकंडक्टर हब (Semiconductor Hub) होण्याच्या भारताच्या स्वप्नांना मोठा झटका बसला. चीनला शह देण्यासाठी पंतप्रधानांनी हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्पाची (Foxconn-Vedanta Project) पायाभरणी गुजरात राज्यात झाली होती. महाराष्ट्रातून हा प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याचा विरोधकांचा आरोप होता. त्यावेळी मोठे राजकारण तापले होते. या प्रकल्पासाठी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील जमिनीची पाहणी झाल्याचा दावा महाविकास आघाडी सरकारने केला होता. सुरुवातीपासूनच वादात असलेल्या या प्रकल्पाचा शेवट सुद्धा कुठल्या तरी वादातूनच झाल्याची चर्चा आहे. तैवान कंपनी फॉक्सकॉनने तडकाफडकी या प्रकल्पातून माघार घेतली नाही, हे तर स्पष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नांना त्यांच्याच राज्यात कोणी सुरुंग लावला असेल बरं?

करारच केला रद्द तैवानची कंपनी फॉक्सकॉन टेक्नॉलॉजीने भारत सरकारसह वेदांता समूहाला झटका दिला. गुजरातमध्ये साकार होणाऱ्या सेमीकंडक्टर उत्पादन प्रकल्पातून माघार घेतली. या कंपनीने 19.5 अब्ज डॉलरचा करार मोडीत काढला. या निर्णयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या, भारताला सेमीकंडक्टर उत्पादनात नंबर वन देश होण्याच्या स्वप्नांना धक्का बसला.

स्वप्नांशी तडजोड नाही भारत सरकारने या घडामोडींवर स्पष्ट भूमिका मांडली. दोन्ही कंपन्या भारतात स्वतंत्रपणे वाटचाल करत आहेत. हा करार रद्द झाल्याने सेमीकंडक्टर हब होण्याचे प्रयत्न सोडणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखरन यांनी या दोन्ही कंपन्या स्वतंत्रपणे या क्षेत्रात रणनीती तयार करत असल्याचा दावा केला. भारताने गेल्या 18 महिन्यात सेमीकॉन क्षेत्रात मोठी झेप घेतल्याचा दावा त्यांनी केला.

दोघांचा निर्णय फॉक्सकॉनने करार मोडण्यासंबंधी बाजू मांडली. एका सेमीकंडक्ट कल्पनेवर दोन्ही कंपन्यांनी सोबत काम करण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर सोबत काम न करण्याविषयी दोन्ही कंपन्यांनी एकमेकांच्या सहकार्याने निर्णय घेण्यात आला. फॉक्सकॉन वेदांताच्या मालकीच्या प्रकल्पातून बाहेर पडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुसऱ्या कंपनीची मदत फॉक्सकॉनच्या माहितीत वेदांता कंपनीने भर घातली. सेमीकंडक्टर प्रकल्पाचे काम थांबणार नाही. कंपनी या प्रकल्पासाठी वचनबद्ध आहे. कंपनी आता नवीन कंपनीच्या, भागीदाराच्या शोधात असल्याचे आणि त्यासंबंधी चर्चा सुरु असल्याचे वेदांताने स्पष्ट केले.

फॉक्सकॉन विस्तार करणार तैवान कंपनी फॉक्सकॉन इलेक्ट्रिक उत्पादने आणि सेमीकंडक्टरसाठी प्रसिद्ध आहे. एप्पल कंपनीचा फोन हीच कंपनी तयार करते. ही कंपनी भारतात सेमीकंडक्टर प्रकल्प विस्तार करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी कंपनीने वेदांतासोबत करार केला होता. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यांत पंतप्रधानांनी गुजरातमध्ये हा प्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती.

कारण तरी काय वृत्तसंस्ता रॉयटर्स नुसार, भारत सरकारकडून PLI योजनेचा लाभ देण्यात मोठा विलंब होत आहे. अनेक परवानग्या मिळण्यात पुन्हा वेळ खर्ची जाणार असल्याने फॉक्सकॉन स्वतंत्रपणे सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्याच्या तयारीला लागले आहे. भारत सरकारने 2026 पर्यंत सेमीकंडक्टर उत्पादन 63 अब्ज डॉलरपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या प्रकल्पासाठी फॉक्सकॉनसह तीन कंपन्या इच्छूक असल्याचे समजते.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...