विमा क्षेत्रात पण एक खिडकी योजना, एकाच प्लॅटफॉर्मवर मिळतील सर्व सेवा

| Updated on: Mar 23, 2024 | 4:16 PM

Insurance Sector | विमा क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहे. त्यादृष्टीने ईरडा अनेक पाऊलं टाकत आहे. आता सर्व विमा पॉलिसी एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळेल. विमा खरेदी, दावा दाखल करणे, विमा पॉलिसी हस्तांतरण सर्व प्रक्रिया येथेच होईल.

विमा क्षेत्रात पण एक खिडकी योजना, एकाच प्लॅटफॉर्मवर मिळतील सर्व सेवा
विमा क्षेत्रात अमुलाग्र बदल
Follow us on

तुम्ही दरवर्षी कार, दुचाकी विमा घेता. कुटुंबियांसाठी आरोग्य विमा, जीवन विम्यात गुंतवणूक करतात. घरासाठी विमा खरेदी करतात. पण त्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळी संबंधित कंपनीच्या संकेतस्थळावर अथवा एजंटकडे जाऊन पॉलिसी खरेदी करावी लागते. पण येत्या काळात तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व पॉलिसीची माहिती मिळणार आहे. पॉलिसी खरेदी करणे, पॉलिसी सहज पोर्ट पण करता येईल. ही पॉलिसी खरेदी करताना आधुनिक पेमेंट सेवांचा लाभ घेता येईल. ईरडाने त्यासाठी पाऊल टाकले आहे.

IRDAI चे बीमा सुगम

ग्राहकांना विमा संदर्भातील सर्व माहिती, सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर मिळावी यासाठी आयआरडीएआय (IRDAI) आणि ओएनडीसीने (ONDC) एक इलेक्ट्रॉनिक मार्केट तयार करण्याची घोषणा केली आहे. बीमा सुगम हे एक प्रकारे विमा सोयी-सुविधांसाठीचा एक मंच असेल. याठिकाणी विमा क्षेत्रातील सर्वच कंपन्यांची माहिती सहज मिळेल.

हे सुद्धा वाचा

बीमा सुगमचा एक क्रमांक

विमा कंपन्या आणि वितरक यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म देण्यात येईल. बीमा सुगम ग्राहकांना एक विमा खाते क्रमांक देईल. त्यामुळे तुम्ही एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीकडे तुमची पॉलिसी सहजरित्या पोर्ट करु शकाल. बीमा सुगम विषयी IRDAI चे चेअरमन देबाशीष पांडा यांनी सांगितले की हा विमा इंडस्ट्रीसाठी हा युपीआय सारखा बदल ठरणार आहे. याठिकाणी विमा खरेदी-विक्री व्यतिरिक्त विमा कंपन्या एपीआय (API) च्या माध्यमातून दाव्यांचा निपटारा पण करतील. त्याची माहिती ग्राहकांना एकाच ठिकाणी घेता येईल.

एक खिडकी योजना

  • विमा क्षेत्रातील सर्व सेवांसाठी वन स्टॉप सोल्यूशन्स देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. हे मार्केट ग्राहक, विमा कंपन्या, मीडिएटर आणि एजंटसाठी असेल. ही एक प्रकारे एक खिडकी योजना असेल. बीमा सुगम ओएनडीसी (ONDC) सारखे असेल. त्यामुळे ग्राहकांना, एजंटला एकाच प्लॅटफॉर्मवर भेटता येईल. ग्राहकांना याच ठिकाणी विमा कंपन्यांच्या विमा पॉलिसीची माहिती पण मिळेल.
  • बीमा सुगम प्लॅटफॉर्मवर विमा खरेदी आणि विक्रीसह ग्राहकांना दावा करण्याची सुविधा पण मिळेल. याशिवाय ऑनलाईन वितरक पण या प्लॅटफॉर्मचा हिस्सा होऊ शकतील. मार्केटप्लेस, हे विमा क्षेत्रातील सर्वांसाठी खुले असेल. या प्लॅटफॉर्मवर ग्राहक, विमा विक्रेते, एजंट, कंपन्या सर्वच उपस्थित असतील. यामुळे ग्राहकांना सहज सुविधा मिळतील. तर विमा क्षेत्रात अजून पारदर्शकता येईल.