AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL Media Rights: मुकेश अंबानींना खूश करणारी मोठी बातमी, बडा मासा माघार घेण्याच्या तयारीत

क्रिकेट विश्वात सध्या आयपीएलच्या मीडिया राइट्सवर (IPL Media Rights) सर्वांच लक्ष आहे. हे मीडिया राइट्स कोणाला मिळतात, ते महत्त्वाच ठरणार आहे.

IPL Media Rights: मुकेश अंबानींना खूश करणारी मोठी बातमी, बडा मासा माघार घेण्याच्या तयारीत
अदानींना अंबानीImage Credit source: twitter
| Updated on: Jun 10, 2022 | 6:12 PM
Share

मुंबई: क्रिकेट विश्वात सध्या आयपीएलच्या मीडिया राइट्सवर (IPL Media Rights) सर्वांच लक्ष आहे. हे मीडिया राइट्स कोणाला मिळतात, ते महत्त्वाच ठरणार आहे. यंदा अ‌ॅमेझॉन (Amazon) आणि वायकॉम 18 (Viacom 18) या दोन दिग्गज कंपन्या मीडिया राइट्स मिळवण्याच्या शर्यतीत आहेत. मीडिया राइटसच्या लिलावाच पॅटर्न यावेळी थोडा वेगळा असणार आहे. टीवी राइट्ससाठी वेगळी आणि लाइव स्ट्रीमिंगसाठी वेगळी बोली लागेल. अ‌ॅमेझॉन प्राइम सर्विससाठी, लाइव स्ट्रीमिंगच हक्त विकत घेण्याच्या शर्यतीत उतरली होती. पण आता आयपीएल मीडिया राइटसमधून अ‌ॅमेझॉन माघार घेणार अशी चर्चा आहे. असं झालं तर मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्री आणि वॉल्ट डिजनीमध्ये मुख्य स्पर्धा असेल.

अ‌ॅमेझॉनने आधीच 6 बिलियन डॉलरची गुंतवणूक केलीय

12 जूनला होणाऱ्या या लिलावाची किंमत 7.7 बिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकते. द प्रिंटच्या वृत्तानुसार, जेफ बेजॉस यांची कंपनी आयपीएल मीडिया राइट्समधून माघार घेऊ शकते. अ‌ॅमेझॉनने आधीच 6 बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. अशावेळी फक्त ऑनलाइन स्ट्रीमिंगसाठी एवढी गुंतवणूक करण्यात अर्थ नाहीय.

मुकेश अंबानी यांनी 2021 मध्येच बनवली टीम

अ‌ॅमेझॉनने माघार घेतली, तर त्याचा रिलायन्स, डिजनी आणि सोनी ग्रुपला फायदा होऊ शकतो. याच तीन कंपन्या स्ट्रीमिंगसाठी बोली लावतील. रिलायन्सने 2021 मध्येच या लिलावाची तयारी सुरु केली होती. मुकेश अंबानी यांनी अनेक दिग्गजांची टीम बनवली व यावर काम सुरु केलं. अ‌ॅमेझॉनचे जेफ बेजोस आणि वायकॉमचे मुकेश अंबानी ही उद्योग क्षेत्रातील दोन मोठी नाव आहेत. त्यांच्यातील स्पर्धा देखील सर्वांना माहित आहे. आता बेजोस यांची माघार अंबानी यांच्या पथ्यावर पडू शकते.

बीसीसीआय होणार मालामाल

भारतीय क्रिकेट बोर्ड या लिलावातून बक्कळ पैसा कमावणार आहे. याआधी 2018 ते 2022 साठी मीडिया राइट्स दिले होते. त्यातून 16 हजार कोटीपेक्षा जास्तची कमाई झाली होती. यावेळी 50 ते 60 हजार कोटीपर्यंत बीसीसीआय कमाई करु शकते.

तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.