AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Price Today : खरेदीची सुवर्णसंधी, सोने गडगडले की हो! अमेरिकेन केंद्रीय बँकेचे ग्रहण, भावात सातत्याने घसरण

Gold Silver Price Today : सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण आली आहे. सराफा बाजारासोबतच वायदे बाजारातही या घौडदौडीला ब्रेक लागला आहे. अमेरिकन केंद्रीय बँकेच्या व्याजदराबाबतच्या चर्चांनी हा परिणाम साधला आहे.

Gold Silver Price Today : खरेदीची सुवर्णसंधी, सोने गडगडले की हो! अमेरिकेन केंद्रीय बँकेचे ग्रहण, भावात सातत्याने घसरण
सोने-चांदीचा भाव काय
| Updated on: Apr 29, 2023 | 9:25 AM
Share

Gold Silver Price Today : सोने-चांदीच्या घौडदौडीला सराफा बाजारातच नाही तर वायदे बाजारातही ब्रेक लागला आहे. अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्ह पुन्हा व्याजदरात वाढ करण्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चेचा परिणाम या दोन्ही धातूंच्या किंमतींवर दिसून येत आहे. हे दोन्ही धातू दबावाखाली आल्याने त्यामध्ये मोठी घसरण दिसून आली आहे. वायदे बाजारात सोने 61,371 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. पण व्याजदर वाढीच्या चर्चांमुळे भाव एक हजार रुपयांनी घसरले. जूनच्या वायदे करारासाठी हा भाव आता 59,945 रुपये प्रति 10 ग्रॅम ठेवण्यात आला आहे. सराफा बाजारात तर 19 एप्रिलनंतर सोने-चांदीची (Gold Silver Price ) घौडदौड थंडावली आहे.

महागाईचा आगडोंब अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्ह गेल्या एक वर्षांपासून महागाई आटोक्यात आणण्यासाठी आक्रमक धोरण राबवित आहे. सातत्याने व्याज दर वृद्धी करण्याचा सपाटा केंद्रीय बँकेने लावला होता. मध्यंतरी बँकेने थोडं नरमाईचे धोरण आखले. आता पुन्हा बँक आक्रमक धोरण राबविण्याचा विचार करत आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून या चर्चांमुळे सोने-चांदीवर मोठा दबाव आला आहे. त्यामुळेच नवीन वायदे सौदे कमी किंमतीत अडकून पडले आहेत. तर सराफा बाजारात ही किंमतींच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. व्याजदरात 25 बेसिस पॉईंट वाढीची शक्यता आहे.

आज काय भाव गुडरिटर्न्सनुसार, 29 एप्रिल रोजी, सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळा 55,900 रुपये तर 24 कॅरेटचा भाव 60,970 रुपये प्रति तोळा आहे. सोन्याच्या भावात जवळपास 200 रुपयांची घसरण झाली आहे. 19 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोने प्रति तोळा 56,200 रुपये होते. तर 24 कॅरेटचा भाव 61,310 रुपये प्रति तोळा आहे. आयबीजेए, शनिवार आणि रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी भाव जाहीर करत नाही.

देशात सोने होणार स्वस्त? सीईपीएनुसार, भारत 2023-24 मध्ये संयुक्त अरब अमिरातकडून 14 कोटी टन सोने अत्यंत माफत शुल्क देऊन आयात करणार आहे. प्रभावी सीमाशुल्क किंवा मोस्ट फेव्हर्ड नेशन दराच्या अनुषंगाने केवळ 1 टक्के सवलतीवर आयात होईल. सध्या त्यासाठी 15 टक्के शुल्क आकारण्यात येत आहे. यामुळे देशात सोने स्वस्त होण्याची अटकळ बांधण्यात येत आहे.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?