AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NVIDIA च्या शेअरने गुंतवणूकदारांना पछाडले, तुम्ही पण खरेदी करु शकता हा स्टॉक, करा हे झटपट काम

American Share Market | तर जगभरात अमेरिकन चिप निर्माता कंपनी NVIDIA च्या शेअरची तुफान चर्चा रंगली आहे. मंगळवारी या शेअरने चमत्कार घडवला होता. भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्सला माईलस्टोन गाठायला 22 वर्षे लागली, ते काम या कंपनीने एका दिवसात केले.

NVIDIA च्या शेअरने गुंतवणूकदारांना पछाडले, तुम्ही पण खरेदी करु शकता हा स्टॉक, करा हे झटपट काम
| Updated on: Feb 24, 2024 | 3:02 PM
Share

नवी दिल्ली | 24 February 2024 : कम्प्युटर चिप णि ग्राफिक्स कार्ड तयार करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी एनव्हिडियाने (NVIDIA) कमाल केली. या कंपनीच्या शेअरने एकाच दिवशी 16 टक्क्यांची झेप घेतली. एकाच दिवसाच्या उसळीने या कंपनीने इतिहास रचला. या कंपनीचे मार्केट भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एकूण बाजारातील भांडवला इतके एकाच दिवशी वाढले. मेरिकेतील दिग्गज वित्तसंस्था गोल्डमॅन सॅक्सने (Goldman Sachs) या शेअरला पृथ्वीवरील सर्वात महत्वपूर्ण स्टॉक म्हणून जाहीर केले आहे. Chip Manufacturer एनव्हिडियाने काही दिवसांपूर्वीच बाजारातील मोठी कंपनी गुगलला बाजारातील भांडवलाआधारे मागे टाकले आहे.

रिलायन्स आणि एनव्हिडियोचे मार्केट कॅप

रिलायन्स इंडस्ट्रीजचे एकूण बाजारातील भांडवल आजच्या तारखेला 20,20,470.88 कोटी रुपये इतके आहे. तर एनव्हिडियोच्या एका शेअरने एका दिवशी, 22 जानेवारी रोजी 16 टक्क्यांची उसळी घेतली. हा शेअर 785.38 डॉलरवर पोहचला. या कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 277 अब्ज डॉलर, 22,96,107 कोटी रुपयांनी वधारले. त्याने दोन ट्रिलियन डॉलरचा आकडा पार केला.

Amazon-Google ला टाकले मागे

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, AI Chip निर्माता कंपनीने गेल्या वर्षभरात जोरदार आगेकूच केली. तर यावर्षात, 2024 मध्ये नॅस्डॅक 100 इंडेक्सच्या आतापर्यंतची जोरदार घौडदौड केली आहे. या महिन्यात या कंपनीने अजून एक जोरदार कामगिरी बजावली. एनव्हिडियाने गेल्या आठवड्यात मंगळवारी मोठी झेप घेतली. कंपनीचे मार्केट कॅप सर्वाधिक वाढले. या कंपनीने गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट इंक आणि दिग्गज ई-कॉमर्स कंपनी Amazon ला पिछाडीवर टाकले.

करा कंपनीत गुंतवणूक

  1. जर एखादी कंपनी जोरदार घौडदौड करत असेल तर गुंतवणूकदार तिच्याकडे आकर्षीत होतातच. तुम्हाला या कंपनीत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे आंतरराष्ट्रीय डीमॅट वा ट्रेडिंग अकाऊंट असणे आवश्यक आहे.
  2. Groww, Angle One, IND Money यासारखे प्लॅटफॉर्म ही सुविधा देतात. तर भारतातील अनेक बँकांची डीमॅट खाती, ICICI Direct, HDFC Securities, Kotak Securities हे पण अमेरिकेन शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्याच्या शेअरमध्ये गुंतवणुकीची सुविधा देतात. या एपच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक करु शकता.
  3. अनेक म्युच्युअल फंड असे आहेत, जे अमेरिकन स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात. त्यामाध्यमातून तुम्ही अमेरिकन कंपन्यांमध्ये पैसा गुंतवू शकता आणि चांगली कमाई करु शकता. अर्थातच शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे जोखमीचे काम आहे. त्यामुळे गुंतवणूकीपूर्वी तज्ज्ञाचा सल्ला आवश्य घ्या.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.