AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नैसर्गिक वायूच्या किमतीत 62% वाढीची घोषणा, नवीन दर 1 ऑक्टोबरपासून लागू, CNGच्या दरावर थेट परिणाम?

जर नैसर्गिक वायू अवघड ठिकाणांपासून तयार केला जात असेल, जेथे उत्पादन करणे अधिक धोकादायक असेल, तर किंमत $ 6.13 MMBTU निश्चित करण्यात आली. या गॅसचा वापर खत तयार करण्यासाठी, वीज निर्मितीसाठी आणि सीएनजी गॅससाठी केला जातो. अशा परिस्थितीत आता लवकरच सीएनजीदेखील महाग होणार आहे.

नैसर्गिक वायूच्या किमतीत 62% वाढीची घोषणा, नवीन दर 1 ऑक्टोबरपासून लागू, CNGच्या दरावर थेट परिणाम?
lpg gas3322
| Edited By: | Updated on: Sep 30, 2021 | 7:43 PM
Share

नवी दिल्लीः सरकारने नैसर्गिक वायू किंवा घरगुती गॅसच्या किमतीत 62 टक्के मोठी वाढ जाहीर केलीय. नैसर्गिक वायूची किंमत आता ऑक्टोबर-मार्चच्या अर्ध्या (ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022) साठी $ 2.90 MMBTU (मेट्रिक मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट्स) पर्यंत वाढली. एप्रिल-सप्टेंबर 2021 च्या अर्ध्यासाठी ही किंमत $ 1.79 प्रति MMBTU होती.

वीज निर्मितीसाठी आणि सीएनजी गॅससाठी केला जातो

जर नैसर्गिक वायू अवघड ठिकाणांपासून तयार केला जात असेल, जेथे उत्पादन करणे अधिक धोकादायक असेल, तर किंमत $ 6.13 MMBTU निश्चित करण्यात आली. या गॅसचा वापर खत तयार करण्यासाठी, वीज निर्मितीसाठी आणि सीएनजी गॅससाठी केला जातो. अशा परिस्थितीत आता लवकरच सीएनजीदेखील महाग होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आधीच गगनाला भिडलेत. अशा परिस्थितीत आता सीएनजीची राईडही खूप महाग होण्याची शक्यता आहे.

घरगुती गॅसची किंमत प्रत्येकी सहा महिन्यांसाठी लागू

घरगुती गॅसची किंमत वर्षातून दोनदा निश्चित केली जाते, जी प्रत्येकी सहा महिन्यांसाठी लागू आहे. 30 सप्टेंबरला दर पुढील सहा महिन्यांसाठी अर्थात मार्चपर्यंत निश्चित आहे. 31 मार्चला दर पुढील सहा महिन्यांसाठी म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत निर्धारित केला जातो. 2018-19 या आर्थिक वर्षापासून देशांतर्गत कंपन्यांनी उत्पादित केलेल्या गॅसच्या किमतीवर दबाव दिसून येत आहे. FY19 च्या एप्रिल-सप्टेंबरच्या सहामाहीत घरगुती गॅसची किंमत $ 3.69 प्रति MMBTU होती.

ओएनजीसी, ऑईल इंडियासाठी आनंदाची बातमी

असे मानले जाते की, एप्रिल 2022 मध्ये पुन्हा एकदा नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी वाढ होणार आहे. ही बातमी ONGC, Oil India, HOEC सारख्या कंपन्यांसाठी खूप चांगली आहे. या नैसर्गिक वायू निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत. दुसरीकडे ती वापरणाऱ्या कंपन्यांसाठी ही चांगली बातमी नाही. अशा परिस्थितीत खत कंपनी, IGL, गुजरात गॅस, MGL, काही वीज कंपन्यांसाठी ही वाईट बातमी आहे. या बातमीचा परिणाम त्यांच्या शेअरवर शुक्रवारीही दिसून येईल.

संबंधित बातम्या

बँकांसमोर उभं मोठं संकट! बऱ्याच नोटांचं झालं नुकसान, RBI आता काय करणार?

SBI Car Loan: 7.75% व्याजदर, शून्य प्रक्रिया शुल्क, घरी बसून असा करा अर्ज

Announcing 62% increase in natural gas prices, new rates effective from 1st October, direct effect on CNG rates?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.