AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadhar Card News | तुमच्या आधार कार्डचा गैरवापर तर होत नाही ना?  या सोप्या पद्धतीने मिळवा बिनचूक माहिती

Aadhar Card Misused : आधार कार्ड हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी महत्वाचा दस्ताऐवज झाला आहे. त्याचा गैरप्रकारही वाढला आहे. या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी आधारकार्डचा वापर कुठे होतोय हे पाहणं आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही सजग राहणे आवश्यक आहे.

Aadhar Card News | तुमच्या आधार कार्डचा गैरवापर तर होत नाही ना?  या सोप्या पद्धतीने मिळवा बिनचूक माहिती
आधारचा गैरवापर टाळाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 16, 2022 | 12:05 PM
Share

Aadhar Card Misused News : आधार कार्ड हे देशातील नागरिकांसाठी महत्वपूर्ण दस्ताऐवज झाला आहे. नागरिकांना ओळख पटवून देण्यासाठी आधारकार्ड (Aadhar Card) हे प्रमाण मानण्यात येते. सध्या आधारकार्डचे गैरप्रकार (Misused of Aadhar Card) ही सर्रास वाढले आहेत. त्यामुळे या कार्डची सुरक्षा करणे गरजेचे झाले आहे. पण तुमच्या आधार कार्डचा गैरवापर होत असल्याचे तुम्ही कसे ओळखाल? आधार कार्ड भलत्याच कामासाठी दुस-यानेच वापर केला असेल तर त्याची माहिती तुम्हाला कशी मिळणार ? अशा एक ना अनेक प्रश्न तुमच्यासमोर उभे ठाकले असतील तर त्याचे उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. आधार कार्डचा गैरवापर पाहता, आधार कार्ड कुठे कुठे वापरण्यात येत आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच हा लेखन प्रपंच. ही माहिती मिळवणे सहज शक्य आहे. तुम्ही सहज तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे करण्यात आला याची माहिती मिळवू शकता. या सर्व गोष्टींचा तपशील (Details of Use) तुम्हाला मिळवता येतो. कसा ते पाहुयात.

कशी मिळवाल माहिती ?

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDA) नागरिकांना त्यांच्या आधार कार्डचा वापर कुठे आणि कसा करण्यात आला याची माहिती देण्याची सोय केली आहे. यूआयडीएआयच्या अधिकृत संकेतस्थळावरhttps://uidai.gov.in/ नागरिकांना ही माहिती जाणून घेता येईल. आधार कार्ड वापराचा इत्यंभूत तपशील मिळविता येईल. या संकेतस्थळावर नागरिकांना आधार प्रमाणीकरण हिस्ट्री टूल मिळेल, ज्याद्वारे तुम्ही आधार कार्डचे तपशील तपासू शकता. यात तुम्हाला तुमचे आधार कुठे वापरले गेले आहे हे कळू शकते.

मास्क्ड आधार कशी करते सुरक्षा?

सुरक्षेच्या दृष्टीने यूआयडीएआयने आधार कार्डची फोटोकॉपी देण्याऐवर्जी मास्क्ड केलेले आधार’ वापरण्याचा सल्ला दिला आहे. मास्क केलेल्या आधारमध्ये, आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे 4 अंक दिसतात.  https://myaadhaar.uidai.gov.in या संकेतस्थळावरून डाउनलोड केले जाऊ शकते. हॉटेल्स किंवा फिल्म हॉलसारख्या परवाना नसलेल्या खासगी संस्थांना आधार कार्डची प्रत ठेवण्याची परवानगी नाही.

असा मिळवा तपशील

  1. सर्वात अगोदर यूआयडीएआयची अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा
  2. ‘माय आधार टॅबमध्ये, तुम्हाला आधार सेवा चा पर्याय दिसेल, याठिकाणी ‘Aadhar Authentication History’ या पर्यायावर क्लिक करा
  3. येथून एक नवीन पेज उघडेल, जिथे तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल
  4. त्यानंतर कॅप्चा कोड टाका. ‘Generate OTP’ बटणावर क्लिक केल्यानंतर दुसरे पेज उघडेल.
  5. येथे तुम्हाला मागील व्यवहारांचे तपशील पाहण्याचा पर्याय मिळेल
  6. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी टाकावा लागेल
  7. यानंतर, गेल्या काही दिवसांमध्ये जिथे जिथे आधार कार्ड वापरले गेले त्याची तारीख, वेळ आणि ऑथेंटिकेशनची माहिती समोर दिसले. तुम्ही एका वेळी केवळ 50 व्यवहारांचे तपशील जाणून घेऊ शकाल
  8. हे व्यवहार पाहून तुम्ही हे सर्व व्यवहार स्वतः केले आहेत की काही संशयास्पद ठिकाणी वापर झाला आहे याची माहिती कळेल

Follow Us
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?