AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ATM कार्ड असेल तर मृत्यूनंतर मिळतात 10 लाख रुपये, कसे? जाणून घ्या पटापट

आजच्या काळात एटीएम कार्ड हा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाचा भाग बनला आहे. आज प्रत्येकजण आपल्या सोबत रोख रक्कम न ठेवता एटीएम कार्ड ठेवतो. यामुळे व्यवहार करणे देखील सोपे झाले आहे. फक्त एटीएममधून पैसे काढण्यापर्यंतच एटीएमचा फायदा नाही. तर एटीएमचे आणखीही बरेच फायदे आहेत. एटीएम कार्डच्या माध्यमातून अनेक सुविधा दिल्या जातात. मात्र माहिती अभावी लोकांना त्याचा […]

ATM कार्ड असेल तर मृत्यूनंतर मिळतात 10 लाख रुपये, कसे? जाणून घ्या पटापट
debit cardImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 04, 2024 | 5:31 PM
Share

आजच्या काळात एटीएम कार्ड हा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाचा भाग बनला आहे. आज प्रत्येकजण आपल्या सोबत रोख रक्कम न ठेवता एटीएम कार्ड ठेवतो. यामुळे व्यवहार करणे देखील सोपे झाले आहे. फक्त एटीएममधून पैसे काढण्यापर्यंतच एटीएमचा फायदा नाही. तर एटीएमचे आणखीही बरेच फायदे आहेत. एटीएम कार्डच्या माध्यमातून अनेक सुविधा दिल्या जातात. मात्र माहिती अभावी लोकांना त्याचा लाभ घेता येत नाही. त्यात काही बँकाही त्यांच्या ग्राहकांना ही माहिती देत ​​नाहीत.

जेव्हा तुम्हाला बँकेकडून एटीएम कार्ड दिले जाते तेव्हा ग्राहकांना अपघात विमा आणि अकाली मृत्यू विमा मिळतो. मात्र माहितीअभावी एटीएम कार्डधारकाचा अपघात आणि अकाली मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ मिळत नाही.

जाणून घ्या कोणत्या बँकेचे एटीएम कार्ड विमा देते?

ATM कार्डनुसार अपघात आणि अकाली मृत पावलेल्या व्यक्तीच्या परिवाराला विमा उपलब्ध होतो. बँकांच्या नियमांनुसार जर 45 दिवसांपासून कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा गैर-राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम वापरत असेल, तर त्याला एटीएम कार्डच्या श्रेणीनुसार विम्याची रक्कम दिली जाते.

ज्या व्यक्तींकडे क्लासिक कार्ड आहे त्यांना एक लाख रुपये, प्लॅटिनम कार्डवर दोन लाख रुपये, ऑर्डिनरी मास्टरकार्डवर पन्नास हजार रुपये, प्लॅटिनम मास्टरकार्डवर पाच लाख रुपये, तर दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत विमा मिळू शकतो. तसेच ज्यांच्याकडे व्हिसा कार्ड आहे त्यांना लाखापर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते. त्याच रुपे कार्डवर एक ते दोन लाख रुपयांचा विमा देखील मिळतो.

वेगवेगळ्या परिस्थितींसाठी किती विमा?

जर तुम्ही वर नमूद केलेले एटीएम कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला त्यानुसार विमा दिला जातो, ज्यामध्ये जो कार्डधारक एक हात किंवा एका पायाने अपंग आहे, त्या व्यक्तीला 50 हजार रुपयांचा विमा दिला जातो. तसेच एखाद्याचे दोन्ही हात किंवा पायांना अपंगत्व आलेले आहे किंवा मृत्यू झाल्यास कार्डानुसार त्या व्यक्तीला 1 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतचा विमा दिला जातो.

जर एखाद्या कार्डधारकाचा अकाली मृत्यू झाला, तर त्याच्या नॉमिनी संबंधित बँकेच्या शाखेत दाव्यासाठी अर्ज करू शकता. त्यासाठी एफआयआरची प्रत, उपचार प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील. यामुळे काही दिवसांनी मृत झालेल्या कुटुंबियांना बँक खात्यात क्लेम येतो.

तसेच एटीएम कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास अशा परिस्थितीत कार्डधारकाच्या नॉमिनीने मृत्यू प्रमाणपत्र, एफआयआर प्रत, आश्रितांचे प्रमाणपत्र, मृत व्यक्तीच्या प्रमाणपत्राची मूळ प्रत सादर करावी लागते. या सर्व प्रक्रियेनंतर तुम्हाला विमा मिळतो.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.