AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता घर बसल्या जनरेट करा ATM चा पिन, या बँकेने दिली खास सुविधा

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास सुविधा आणत आहे ज्यामध्ये कुठल्याही शाखेत किंवा एटीएमध्ये न जाताही पिन जनरेट करू शकता.

आता घर बसल्या जनरेट करा ATM चा पिन, या बँकेने दिली खास सुविधा
| Edited By: | Updated on: Feb 02, 2021 | 1:41 PM
Share

मुंबई : कुठल्याही बँकेमध्ये आपलं खातं उघडल्यानंतर सोप्या पद्धतीने आणि सहज व्यवहार करण्यासाठी डेबिट कार्ड महत्त्वाचं आहे. आता तुमच्या नवीन डेबिट कार्डचा पिन जनरेट करण्यासाठी एटीएम किंवा शाखेत जावं लागतं. पण आता असं करण्याची काही गरज नाही कारण, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास सुविधा आणत आहे ज्यामध्ये कुठल्याही शाखेत किंवा एटीएमध्ये न जाताही पिन जनरेट करू शकता. या पिनला ग्रीन पिन म्हणतात. डेबिट कार्ड पिन जनरेट करण्याची ही पद्धत सगळ्यात सोपी आहे. हे आयव्हीआर, इंटरनेट बँकिंगद्वारेही केलं जाऊ शकतं. (ATM pin how to generate sbi atm pin by sms state bank of india personal banking)

इंटरनेट बँकिंगद्वारे असा करा पिन जनरेट

इंटरनेट बँकिंगद्वारे पिन जनरेट करण्यासाठी आधी तुम्हाला www.onlinesbi.com वर जावं लागेल. तिथे तुम्ही लॉग इन करून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड टाका. यानंतर, दिलेल्या पर्यायांमधून ‘ई-सेवा’ टॅब अंतर्गत ‘एटीएम कार्ड सेवा’ असा पर्याय निवडा. यानंतर एटीएम पिन जनरेशन या पर्यायावर क्लिक करा. तुम्ही दोन पर्यायांद्वारे एटीएम पिन जनरेट करू शकता. यामध्ये ओटीपी आणि पासवर्ड महत्त्वाचा असणार आहे. जर तुम्ही ओटीपीच्या पर्याया निवडला तर तुम्हाला नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल.

यानंतर सेव्हिंग अकाऊंट असा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला एटीएम कार्डसाठी पासवर्ड विचारला जाईल. तो सबमिट केल्यानंतर नवीन पिनचे प्रथम दोन अंक तुम्ही भरा आणि उर्वरित दोन अंक एसएमएसद्वारे तुम्हाला पाठवले जातील. मोबाईल नंबरवर मेसेजद्वारे मिळालेले पहिले दोन अंक आणि दुसरे दोन अंक एकत्र करून सबमिटवर क्लिक करा. यानंतर तुमचं कार्ड हे खात्याशी जोडलं जाईल.

SBI ने ग्राहकांसाठी सुरू केल्या या 9 सुविधा

– नकदी प्राप्ति (कॅश पिकअप)

– रोख वितरण (कॅश डिलिव्हरी)

– चेक मिळवणे (पिकअप)

– मागणी स्लिप तपासणे

– फार्म 15H पिकअप

– ड्राफ्ट वितरण

– मुदत ठेव माहिती (सल्ला) आणि वितरण

– जीवन प्रमाणपत्र पिकअप करणे

– केआयसी कागदपत्रांची निवड

या सेवेचा कोण घेऊ शकतं फायदा

एसबीआयच्या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, नेत्रहीन व्यक्ती आणि अपंग या सुविधेचा फायदा घेऊ शकतात. इतकंच नाहीतर 70 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिकही या सेवेचा लाभ घेऊ शकतात. (ATM pin how to generate sbi atm pin by sms state bank of india personal banking)

संबंधित बातम्या – 

फक्त 50 हजार लावून कमवा 2.50 लाख, आताच सुरू करा डबल फायदा असलेला ‘हा’ बिझनेस

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी अलर्ट; RBI ने घेतला मोठा निर्णय, थेट होणार तुमच्यावर परिणाम

क्षणात गुंतवणुकदारांची संपत्ती 4 लाख कोटींनी वाढली, बजेटनंतर Stock Market ने मोडला रेकॉर्ड

बाजार भावापेक्षा 500 रुपयांनी स्वस्त खरेदी करा सोनं, अशी आहे खास योजना

(ATM pin how to generate sbi atm pin by sms state bank of india personal banking)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?