Share Market : या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान; सचिन तेंडुलकर पण फिदा, मग तुम्ही मागे का?

Multibagger Stock : या शेअरमध्ये महान भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर याने गुंतवणूक केली आहे. आता या शेअरमध्ये 10 टक्क्यांची उसळी आली आहे. तेंडुलकरने या कंपनीत IPO येण्यापूर्वी गुंतवणूक केली होती.

Share Market : या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान; सचिन तेंडुलकर पण फिदा, मग तुम्ही मागे का?
| Updated on: Oct 03, 2025 | 4:36 PM

Azad Engineering Share : स्मॉलकॅप कंपनी आझाद इंजिनियरिंगचा शेअर रॉकेट झाला आहे. आझाद इंजिनिअरिंगचा शेअर शुक्रवारी 10 टक्क्यांहून अधिकने उसळला. हा शेअर 1798 रुपयांवर पोहचला. कंपनीने नुकताच जपानमधील मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीज लिमिटेडसोबत 5 वर्षांचा एक नवीन दीर्घकालीन करार केला. हा करार 651 कोटी रुपयांचा आहे. आता ग्लोबल ब्रोकरेज हाऊस गोल्डमॅन सॅक्सने आझाद इंजिनिअरिंगचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने IPO येण्यापूर्वी या कंपनीत गुंतवणूक केली.

गोल्डमॅन सेक्सने दिले मोठे टार्गेट

ग्लोबल ब्रोकरेज हाऊस गोल्डमॅन सेक्सने आझाद इंजिनिअरिंगचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाऊसच्या मते ही स्मॉलकॅप कंपनी लवकरच कमाल दाखवले. कंपनीचा शेअर 2055 रुपयांपर्यंत उसळी घेईल. म्हणजे सध्याच्या किंमतीपेक्षा हा शेअर 28 टक्क्यांनी उसळी घेईल. गेल्या 6 महिन्यात आझाद इंजिनिअरिंगच्या शेअरमध्ये 30 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 1928 रुपये तर निच्चांकी कामगिरी 1128.40 रुपये इतकी आहे. पण हा शेअर लवकरच सर्व विक्रम मोडीत काढत मोठी झेप घेईल असा दावा ब्रोकरेज हाऊसने केला आहे.

सचिनची 5 कोटींची गुंतवणूक

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आयपीओपूर्वी आझाद इंजिनिअरिंगमध्ये 6 मार्च 2023 रोजी 5 कोटींची गुंतवणूक केली होती. त्यांनी कंपनीचे 4,38,210 शेअर मिळाले होते. तेंडुलकरला या कंपनीचे शेअर 114.10 रुपये प्रति शेअरच्या भावाने मिळाले आहेत. आझाद इंजिनिअरिंगचे शेअर NSE वर 720 रुपयांवर सूचीबद्ध झाले होते. शेअर बाजारात कंपनी दाखल झाल्यानंतर तेंडुलकरच्या 5 कोटी रुपयांचे मूल्य वाढून 31.55 कोटी रुपयांवर पोहचले आहे. तेंडुलकरने शेअरची विक्री केली की नाही हे अद्याप समोर आलेले नाही.

एका महिन्यात आझाद इंजिनिअरिंगचा शेअर 7.23 टक्क्यांनी उसळला आहे. 6 महिन्यात या कंपनीने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर या काळात 26.72 टक्क्यांनी वधारला. तर एका वर्षात या शेअरने 20.95 टक्क्यांची दमदार कामगिरी बजावली आहे. या कंपनीने बाजारात उतरल्यापासून गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.