Share Market : एका महिन्यात गुंतवणूकदार मालामाल; या कंडोम कंपनीची मोठी धाव
फ्लेवर्ड कंडोम तयार करणारी कंपनी अनोंदिता मेडिकेअरचा शेअर 1 ऑक्टोबर रोजी 5 टक्क्यांहून अधिक उसळला. एका महिन्यात कंपनीने गुंतवणूकदारांना मालामाल केले. अनोंदिता मेडिकेअरचा आयपीओचा शेअर 145 रुपयांवर उघडला होता.

कंडोम तयार करणारी कंपनी अनोंदिता मेडिकेअरचा शेअर बुधवारी 1 ऑक्टोबर 2025 रोजी 5 टक्क्यांहून अधिक उसळला. हा शेअर 373 रुपयांवर बंद झाला. कंपनीने एका महिन्यापूर्वी बाजारात एंट्री घेतली. आयपीओमध्ये अनोंदिता मेडिकेअरचा शेअर 145 रुपये होता. कंपनीच्या शेअरने 145 रुपयांच्या इश्यू प्राईसच्या तुलनेत 150 टक्क्यांहून अधिकची उसळी घेतली. अनोंदिता मेडिकेअरच्या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 417.90 रुपये आहे. तर कंपनीचा शेअर 52 आठवड्यातील निच्चांक 261.75 रुपये आहे. . कंपनीच्या आयपीओमध्ये सामान्य गुंतवणूकदारांचा कोटा 286.20 पट सब्सक्राईब झाला. तर संस्थागत गुंतवणूकदारांच्या श्रेणीत तो 531.82 पट सब्सक्राईब झाला. तर क्वॉलीफाईड इन्स्टिट्यूशनल कॅटेगिरीत तो 153.03 पट सब्सक्राईब झाला.
पहिल्या दिवशी 275 रुपयांवर शेअर
अनोंदिता मेडिकेअरचा शेअर 1 सप्टेंबर 2025 रोजी बाजारात सूचीबद्ध झाला. कंपनीचा शेअर 275.50 रुपयांवर सूचीबद्ध झाला आणि त्याच दिवशी या शेअरमध्ये मोठी उसळी दिसली. हा शेअर त्याच दिवशी 289.25 रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या पब्लिक इश्यूची एकूण साईज 69.50 कोटी रुपयांपर्यंत होती. अनोंदिता मेडिकेअरचा आयपीओ 22 ऑगस्ट 2025 रोजी उघडलाआणि 26 ऑगस्टपर्यंत यामध्ये गुंतवणुकीची संधी देण्यात आली. अनोंदिता मेडिकेअर पुरुष आणि महिलांसाठी फ्लेवर्ड कंडोम तयार करते. कंपनीचे उत्पादन कोब्रा या ब्रँडच्या नावाखाली विक्री करते. कंपनी वार्षिक 562 दशलक्ष कंडोमची निर्मिती करते.
IPO वर 300 पट सब्सक्राईब
अनोंदिता मेडिकेअरचा आयपीओ एकूण 300.89 पट सब्सक्राईब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये सामान्य गुंतवणूकदारांचा कोटा 286.20 पट सब्सक्राईब झाला. तर संस्थागत गुंतवणूकदारांच्या श्रेणीत तो 531.82 पट सब्सक्राईब झाला. तर क्वॉलीफाईड इन्स्टिट्यूशनल कॅटेगिरीत तो 153.03 पट सब्सक्राईब झाला. आयपीओच्या दोन लॉटमध्ये 2000 शेअर होते.
कंपनीची व्यावसायिक उलाढाल
अनोंदिता मेडिकेअर पुरुष आणि महिलांसाठी फ्लेवर्ड कंडोम तयार करते. कंपनीचे उत्पादन कोब्रा या ब्रँडच्या नावाखाली विक्री करते. कंपनी वार्षिक 562 दशलक्ष कंडोमची निर्मिती करते. कंपनी कंडोमचे उत्पादन नोएडामध्ये करते. दक्षिणपूर्व आशिया,आफ्रिका आणि मध्य-पूर्वेतील देश हे या कंपनीची प्रमुख बाजारपेठ आहे.
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.
