भारतीय खेळाडूंसाठी बाबा रामदेवांचा खास ‘योग’; पतंजलीचा मिळाला बुस्टर डोस

Patanjali Booster to Indian Sports : भारतीय खेळाडुंनी अनेक मैदाना फत्ते केली आहेत. मैदानं गाजवली आहेत. त्यांच्या विजयात पतंजलीचा मोठा वाटा आहे. रामदेव बाबांच्या योगासह या खेळाडुंना पतंजलीचा खास बुस्टर डोस सुद्धा मिळाला आहे.

भारतीय खेळाडूंसाठी बाबा रामदेवांचा खास योग; पतंजलीचा मिळाला बुस्टर डोस
क्रीडा क्षेत्रासाठी खास योग
Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Mar 19, 2025 | 5:15 PM

भारतातील आयुर्वेदिक आणि स्वदेशी ब्रँड पतंजलीने खेळ आणि तंदुरुस्तीच्या मैदानात स्वतःची खासा ओळख तयार केली आहे. पतंजलीने भारतीय खेळाडू आणि संघाना समर्थन देऊन त्यांच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे. आयुर्वेदिक उत्पादनं आणि खेळाडुंचा खास खुराक त्यांचे पोषण करण्यासाठी पतंजलीने मोठी भूमिका निभावली आहे. पतंजली भारतीय खेळाडुंना मजबूत आणि तंदुरुस्त करत आहे. जाणून घ्या पतंजलीचा तो पाचवा योग, ज्यामुळे भारतीय खेळाडुंनी ‘कर हर मैदान फत्ते’चा नारा दिला आहे.

भारतीय ॲथिलिट आणि संघाच्या यशात पतंजलीचे योगदान

पंतजलीने भारतीय ॲथिलिट आणि संघांच्या यशात मोलाचे योगदान उचलले आहे. खेळाडु आणि संघाला पतंजलीने आर्थिक आणि तांत्रिक समर्थन दिले आहे. पतंजलीने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रयोजकत्व घेऊन त्यांना आर्थिक हातभार लावला आहे. याशिवाय पतंजलीने खेळाडुंना प्रोत्साहित करण्यासाठी विविध कार्यक्रम आणि खेळाचा सराव घेतला. भारतीय खेळाडुंना अधिक चांगली संसाधने आणि योग्य मार्गदर्शन दिले. यामुळे त्यांच्या खेळात लक्षणीय सुधारणा दिसून आली.

आयुर्वेदाने वाढवली खेळाडुंची तंदुरुस्ती

पतंजलीने आयुर्वेदाच्या मदतीने भारतीय खेळाडुंच्या तंदुरुस्ती आणि पुन्हा मैदानात उतरण्यासाठी बळ पुरवले. आयुर्वेदिक उत्पादने वापरून खेळाडुंनी केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षमताच नाही तर दुखापतींमधूनही लवकर सावरण्याची शक्ती दिली. पतंजलीच्या आयुर्वेदिक सप्लिमेंट्स आणि हर्बल उत्पादनांनी खेळाडूंना नैसर्गिक माध्यमातून ऊर्जा मिळवून दिली. त्यांच्या कामगिरीत मोठी सुधारणा झाली.

पतंजली आणि भारतीय हॉकी : राष्ट्रीय अभिमान वाढवला

पतंजलीने भारतीय हॉकी संघासोबत भागीदारी केली. त्यातून राष्ट्रीय अभिमान वाढवला. संघाला केवळ आर्थिक मदतच दिली नाही तर खेळाडुंना आयुर्वैदिक उत्पादने आणि न्युट्रिशनच्या सहाय्याने उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी मदत केली. या सहकार्यामुळे भारतीय हॉकी संघाला नवीन ऊर्जा आणि दिशा मिळाली.

पतंजली स्पोर्ट्स न्यूट्रिशन : खेळाडूंसाठी बाजी पलटली

पतंजली स्पोर्ट्स न्यूट्रिशन प्रोडक्ट्सने खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सक्षम केले. या उत्पादनात नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे खेळाडूंना ऊर्जा, सहनशक्ती आणि त्यांचे स्नायू बळकट ठरले. पतंजली न्यूट्रिशन उत्पादनांनी खेळादरम्यान येणारा थकवा, दुखापत कमी करण्यात मदत केली. त्यामुळे ही उत्पादनं खेळाडूंसाठी बाजी पलटवणारी ठरली.

पतंजलीमुळे भारतीय खेळ इकोसिस्टम मजबूत

पतंजलीने भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इकोसिस्टमसाठी, पारिस्थितिकी तंत्र मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. केवळ खेळाडूंना मदत करून पतंजली थांबले नाही तर खेळासाठी पायाभूत सुविधांच्या विकासातही मोठे योगदान दिले आहे. पतंजलीने तरूण खेळाडूंना संधी देण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले आहे. खेळाच्या विकासात गुंतवणूक केली आहे आणि भारताच्या क्रीडा क्षेत्राला नवीन दिशा दिली आहे.